शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 18:10 IST

तिहेरी तलाकच्या विधेयकाबाबत त्यांनी घेतलेल्या बाजूमुळे त्यांची अल्पसंख्यांकांबाबतची भूमिका उघड झाली आहे'. असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यांच्यावर टीका केली.

आझमगड- काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा आहे असे वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी असे वाक्य उच्चारल्याचे वृत्त इन्किलाब या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे असे काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आणि राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.आझमगड येथील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, 'काँग्रेस हा मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम स्त्रियांचाही आहे? ' इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी राहुल गांधीसह काँग्रेसच्या नेत्यांनी तिहेरी तलाकचे परिणाम भोगणाऱ्या महिलांना भेटावे आणि मगच त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावे असा सल्लाही दिला. हे विधेयक विरोधकांनी अडवल्यामुळे मुस्लीम महिलांच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे अशी टीका त्यांनी केली. 340 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस रस्त्याचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते.

आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडली नाही. ''अनेक इस्लामिक देशांनी तिहेरी तलाक आणि निकाह हलाला या प्रथा बंद केल्या असल्या तरी काँग्रेससह अनेक पक्षांनी ते कायम ठेवले आहेत. जे राजकीय नेते मला पंतप्रधानपदावरुन बाजूला करण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांनी हलाला आणि तिहेरी तलाकमुळे नुकसान झालेल्या महिलांना भेटून संसदेत या विधेयकावर चर्चा करायला हवे. या पक्षांनी कितीही अडथळे आणले तरी हे विधेयक संसदेत संमत होईल असे आश्वासन मी मुस्लीम महिलांना देतो''  असे त्यांनी यावेळेस सांगितले.'काँग्रेस पक्ष हा मुस्लीम पुरुषांचाच आहे की त्यात मुस्लीम महिलांचाही समावेश होतो हे मला नामदार (राहुल गांधी) यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कारण त्यांचे बोलणे आणि कृती एकमेकांच्या विरोधात आहे. तिहेरी तलाकच्या विधेयकाबाबत त्यांनी घेतलेल्या बाजूमुळे त्यांची अल्पसंख्यांकांबाबतची भूमिका उघड झाली आहे'. असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यांच्यावर टीका केली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीचे काही भाषण भोजपुरी भाषेतून केले. आझमगड हा मुलायम सिंह यादव यांचा मतदारसंघ आहे. पूर्व युरोपातील केवळ याच मतदारसंघात भाजपाला 2014 साली यश मिळाले नव्हते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश