बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:22 IST2025-10-31T18:21:41+5:302025-10-31T18:22:03+5:30
Karnataka Crime News: कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे.

बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य
कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणारं हे प्रकरण प्रत्यक्षाच महिलेच्या हत्येचं होतं. तसेच या प्रकरणात मृत महिलेच्या मुलीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून तिची हत्या केल्याचं समोर आलं.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या अल्पवयीन मुलीने तिचा प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून तिची हत्या घडवून आणली. मृत महिलेची ओळख नेत्रावती अशी पटली आहे. ती सर्कल मरम्मा मंदिर रोडजवळ कुटुंबासह राहत असे. तसेच एका लोन रिकव्हरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत असे.
नेत्रावती ही महिला तिच्या मुलीसह पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ही मुलगी दहावीत नापास झाली होती. तसेच ही १७ वर्षीय मुलगी एका १७ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली होती. या मुलाने नववीतून शाळा सोडली होती. हा मुलगा या मुलीच्या मावशीच्या मुलग्याचा मित्र होता. तसेच आरोपी मुलीचे मित्र आणि तिहा हा बॉयफ्रेड सतत घरी यायचे.
दरम्यान, नेत्रावती हिला मुलीच्या अफेअरची कुणकुण हल्लीच लागली होती. तेव्हा तिने मुलीला चांगलेच खडसावले होते. तसेच तिचा प्रियकर असलेल्या मुलग्याला घरी येण्यास मनाई केली होती. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने कट रचून आईचा टॉवेलने गळा आवळला आणि तिचा मृत्यू झाल्यावर मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितील लटकवून ही आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांनंत कुटुंबीयांनी अधिक खोलात जाऊन विचारणा केल्यावर तिने मित्रांनी आईची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.