डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:35 IST2025-11-02T12:35:10+5:302025-11-02T12:35:54+5:30
Gujarat Crime News: एका १५ वर्षीय मुलाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची आणि नंतर गर्भवतीवर बलात्कार करून तिलाही संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. भाऊ आणि वहिनीची हत्या केल्यानंतर या मुलाने दोघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते आईच्या मदतीने पुरल्याचे समोर आले आहे.

डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
एका १५ वर्षीय मुलाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची आणि नंतर गर्भवतीवर बलात्कार करून तिलाही संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. भाऊ आणि वहिनीची हत्या केल्यानंतर या मुलाने दोघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते आईच्या मदतीने पुरल्याचे समोर आले आहे. नातेसंबंधांना कलंक लावणारी आणि सामान्य माणसाला हादरवणारी ही धक्कादायक घटना गुजरातमधील जुनागडपासून ५० किमी अंतराव असलेल्या एका गावात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. पोलिसांनी तपासास सुरुवात केल्यावर शुक्रवारी मृत पती-पत्नीचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ असलेल्या १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तो एका डेअरीमध्ये काम करतो. आरोपीने सांगितले की, माझा भाऊ मला सतत मारहाण करायचा. तसेच पैसेही हिसकावून घ्यायचा. त्यामुळे माझा त्याच्यावर राग होता. या रागाच्या भरात मी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे.
दरम्यान, आरोपी मुलगा भावाची हत्या करत असताना त्याची वहिनी तिथे आली. त्यामुळे तो घाबरला. मला सोड अशी विनवणी वहिनीने त्याच्याकडे केली. तेव्हा तू मला तुझ्याशी संबंध ठेवायला दिलेस, तर तुला सोडेन, असे आरोपीने गर्भवती असलेल्या वहिनीला सांगितले आणि तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यानंतर ती या प्रकाराची कुठेतकरी वाच्यता करेल या भीतीने त्याने तिच्या पोटावर लाथ मारली. तसेच गळा आवळून तिचा खून केला.
धक्कादायक बाब म्हणजे भाऊ आणि वहिनीची हत्या करणाऱ्या या मुलाला मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या आईने मदत केल्याचं समोर आलं आहे. या दोघांनीही मिळून या पती पत्नीचे मृतदेह ५ फूट खोल खड्डा खणून त्यात पुरले होते. त्यापैकी महिलेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत होता. तसेच तिच्या पोटाती गर्भ अर्धा बाहेर आलेला होता. एवढंच नाही तर कुठलाही पुरावा मागे राहू नये, यासाठी त्यांनी मृतांचे कपडेही जाळून टाकले होते.