एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 06:00 IST2020-11-25T06:00:26+5:302020-11-25T06:00:45+5:30

सूद यांची पत्नी सुनीता, मुलगा आशिष, सून गरिमा आणि १३ वर्षांचा नातू यांना ठार मारण्यासाठी धारदार शस्र वापरण्यात आले होते,  असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर वर्मा म्हणाले

Murder of four members of the same family | एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

लुधियाना (पंजाब) : एकाच कुटुंबातील चार जणांची येथील हमब्रान रस्त्यावरील मयूर विहार वसाहतीतील घरात हत्या झाली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. मात्र घराचा मालक आणि मालमत्ता व्यावसायिक राजीव सूद घरी आढळला नाही.

सूद यांची पत्नी सुनीता, मुलगा आशिष, सून गरिमा आणि १३ वर्षांचा नातू यांना ठार मारण्यासाठी धारदार शस्र वापरण्यात आले होते,  असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त समीर वर्मा म्हणाले. गरिमा हिचे वडील तिला भेटायला घरी आले तेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले. घराचे दार कोणीही उघडले नाही तेव्हा त्यांनी शेजाऱ्यांना व पोलिसांना कळवले. या हत्याकांडामागे कुटुंबातील वादाची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. 

Web Title: Murder of four members of the same family