मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

By admin | Published: February 26, 2015 02:03 AM2015-02-26T02:03:06+5:302015-02-26T02:03:06+5:30

मुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास,

Mumbai's huts 'Dabangan' is in the hands of !! | मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

Next

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
मुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास, घरे व पुनर्वसन ही कठीण समस्या झाली आहे, अशी धक्कादायक कबुली केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.
झोपडपट्ट्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,असेही नायडू यांनी लोकसभेत सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीसुद्धा या संदर्भा चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात अडचणी खूप येत आहेत. चर्चेतून समाधानकारक मार्ग सापडत नाही, असे सांगून नायडू यांनी,‘ झोपडपट्ट्या दादा लोकांच्या कशा ताब्यात गेल्या, त्यांची कार्यपध्दती कशी असते,ते कोणालाच कसे जुमानत नाहीत, कायदा धाब्यावर कसा बसवितात ते सविस्तरपणे सभागृहाला सांगितले.
नायडू म्हणाले, २०२२ पर्यंत शहरे व ग्रामीण भागात पक्की घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून मुंबईला अग्रक्रम देण्यात आला आहे. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील झोपड्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाईल.

Web Title: Mumbai's huts 'Dabangan' is in the hands of !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.