शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 12:43 PM

कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय.

नवी दिल्लीः कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत.या प्रकारावर माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले, आपल्याला राजकीय घडामोडींबद्दल माहितीच आहे. मी आता तुमकूरला जातोय आणि संध्याकाळी 4 वाजता परतणार आहे. सध्या आपण प्रतिज्ञा करा, मी कुमारस्वारी आणि सिद्धरामय्यांच्या विधानावर काहीही बोलणार नाही. 

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.राजीनामे दिलेल्या काही आमदारांना राज्यपालांच्या भेटीनंतर मिनीबसमध्ये बसवून विमानतळावर नेण्यात आले. तेथून त्यांना चार्टर्ड विमानाने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले. राहुल गांधी यांच्या पदत्यागाने नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये कर्नाटकमधील या घटनांवर चर्चा करून परिस्थिती सावरण्यासाठी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना बंगळुरूला रवाना केले आहे. राज्यपालांकडून या सर्व आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास कर्नाटकमधील सरकारचे पडू शकते.कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव हे दोघेही राज्यात नसताना हा राजकीय भूकंप घडला. सर्व बंडखोर आमदार विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा अध्यक्ष निघून गेले होते. ते परत येणार नाहीत हे नक्की झाल्यावर आमदारांनी राजीनामे विधिमंडळ सचिव व अध्यक्षांचे स्वीय सचिव यांच्याकडे सुपूर्द केले. नंतर या आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल वजुभाई गाला यांना राजीनाम्याची प्रत दिली होती.

भाजपाचे नेते मंत्री सदानंद गौडा यांनी आघाडीचे सरकार पडल्यास बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन केले जाईल, असे सांगितले. येडियुरप्पा यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले की, अन्य पक्षांमधील या घडामोडींशी भाजपचा काही संबंध नाही. लोकांना पुन्हा निवडणुका नको आहेत. प्रसंगी सरकार स्थापण्याची शक्यता आन्ही आजमावून पाहू.

 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाkumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण