- हरीश गुप्ता, नवी दिल्ली महाराष्ट्र आज सेवा-केंद्रित अर्थव्यवस्थेचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे. राज्याच्या सकल राज्य मूल्यवर्धितमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा अर्ध्याहून अधिक आहे. वित्त-आयटी-मीडिया या त्रिमितीवर उभारलेल्या मुंबई-पुणे आर्थिक कॉरिडॉरने भारताच्या सेवा अर्थव्यवस्थेला गतिमान केले आहे.
नीती आयोगाच्या २०२५ च्या 'इंडियाज सर्व्हिसेस सेक्टर : इनसाइट्स फ्रॉम जीव्हीए ट्रेंड्स अँड स्टेट लेव्हल डायनॅमिक्स' या अहवालानुसार, महाराष्ट्रातून ७.४७ लाख कोटींचे सॉफ्टवेअर निर्यात आणि २३.६ लाख थेट आयटी रोजगार निर्माण झाले आहेत. या दोन शहरांनी मिळून भारताच्या शहरी सेवा क्षेत्रातील परिवर्तनाला दुहेरी इंजिन दिले आहे. शहरी केंद्रे, कौशल्यसंपन्न मनुष्यबळ व मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांमुळे आयटी, वित्त, स्थावर मालमत्ता व व्यावसायिक सेवा या क्षेत्रांना मोठी चालना मिळाली आहे.
या अहवालात ऑडिओ-व्हिज्युअल व डिजिटल सेवा क्षेत्रातील झपाट्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. ओटीटी, गेमिंग व कंटेंट प्लॅटफॉर्म्समुळे डिजिटल उपयोग वाढत आहे.
सकल राज्य मूल्यवर्धितमध्ये सेवांचा हिस्सा
२०११-१२ ५१.१%२०२३-२४ ५९.५%अहवालातून स्पष्ट होते की, मुंबई-पुणे कॉरिडॉर आज भारतातील सर्वांत गतिमान सेवा अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. जिथे अर्थ आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे.
राष्ट्रीय सेवा जीव्हीएमध्ये अग्रस्थानी असलेली राज्ये आणि योगदान (%) (२०२३-२४)
महाराष्ट्र - १३.५७%
तामिळनाडू -८.७९%
उत्तर प्रदेश - ८.४६%
गुजरात - ८.३३%
कर्नाटक - ०८.२७%
प . बंगाल - ५.४८%
तेलंगणा - ५.२२%
दिल्ली - ३.६८%
आधुनिक सेवा क्षेत्रासाठी महाराष्ट्र ठरला आदर्श
महाराष्ट्र विशेषतः उच्च उत्पादकता असलेल्या आधुनिक सेवा क्षेत्रासाठी देशात वेगळा ठरतो. मुंबई-पुणे कॉरिडॉर भारताच्या शक्तिशाली शहरी सेवा समूहांपैकी एक बनला आहे.
भारतातील एकूण वित्तीय सेवांच्या एकूण मूल्यवर्धित मूल्याच्या सुमारे एक चतुर्थांश योगदान देऊन मुंबई देशाच्या वित्तीय सेवा परिसंस्थेत अव्वल आहे.
पुणे आयटी व व्यावसायिक सेवांच्या वेगवान केंद्रात रूपांतरित झाले असून, बंगळुरूच्या समांतर सामर्थ्यशाली आयटी केंद्र म्हणून उदयास आले आहे.
मुंबई-पुण्याचे योगदान
सॉफ्टवेअर निर्यात ७.४७ ख कोटी रुपये
२३.६ लाख नोकऱ्या आयटी क्षेत्रातील थेट रोजगार
Web Summary : Mumbai-Pune corridor fuels India's service sector, driving IT, finance, and real estate growth. Maharashtra leads with significant software exports and IT jobs, becoming a model for modern services. It contributes significantly to national financial services.
Web Summary : मुंबई-पुणे कॉरिडोर भारत के सेवा क्षेत्र को बढ़ावा दे रहा है, जिससे आईटी, वित्त और रियल एस्टेट का विकास हो रहा है। महाराष्ट्र सॉफ्टवेयर निर्यात और आईटी नौकरियों के साथ नेतृत्व करता है, आधुनिक सेवाओं के लिए एक मॉडल बन गया है। यह राष्ट्रीय वित्तीय सेवाओं में महत्वपूर्ण योगदान देता है।