आकोटमधील युवकाचा कसारा घाटात कोसळून मृत्यू मुंबई-अमरावती एक्स्प्रेसमधून कोसळल्याने मृत्यू
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:53+5:302014-12-20T22:27:53+5:30
अकोला - आकोट येथील रहिवासी युवक काम करण्यासाठी मुंबई येथे गेल्यानंतर मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री परत येत असताना एक्स्प्रेसमधून कसारा घाट परिसरात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी या युवकाचा मृतदेह अकोल्यात आणण्यात आला.

आकोटमधील युवकाचा कसारा घाटात कोसळून मृत्यू मुंबई-अमरावती एक्स्प्रेसमधून कोसळल्याने मृत्यू
अ ोला - आकोट येथील रहिवासी युवक काम करण्यासाठी मुंबई येथे गेल्यानंतर मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री परत येत असताना एक्स्प्रेसमधून कसारा घाट परिसरात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी या युवकाचा मृतदेह अकोल्यात आणण्यात आला.अजीमुद्दीन हे रिक्क्षा चालवून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून, यामधील मोठा मुलगा वसीमुद्दीन कामकाज करण्यासाठी मुंबई येथे गेला होता. या ठिकाणी त्याला फळ विक्रेत्याचे कामही मिळाले. दोन महिन्यापासून फळ विक्रेत्याचे काम करीत असताना १८ डिसेंबर रोजी तो अकोला येथे मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने जनरल डब्यात परत येत असताना गर्दीमुळे तो दरवाज्यानजीक उभा राहिला. एक्स्प्रेस कसारा घाट परिसरात आल्यानंतर या युवकाचे संतुलन गेल्याने तो घाटात कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.