भाजपचा पलटवार ; ओवेसींची बडबड पोटापाण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:50 IST2019-06-01T16:49:12+5:302019-06-01T16:50:42+5:30
मोदी सरकारकडे १३० कोटी जनतेचा विश्वास आहे. देशवासीयांना मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षीत असल्याचा पूर्णपणे विश्वास आहे.

भाजपचा पलटवार ; ओवेसींची बडबड पोटापाण्यासाठी
नवी दिल्ली - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी आहेत, असे विधान करणारे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा भाजपकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. भाजपने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. असे ओवेसी म्हणाले होते. त्यावर पलटवार करत,काही लोकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी अनावश्यक बडबड करण्याची सवयी असते. असे भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले.
मोदी सरकारकडे १३० कोटी जनतेचा विश्वास आहे. देशवासीयांना मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षीत असल्याचा पूर्णपणे विश्वास आहे. असे म्हणत नकवी यांनी ओवेसिंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही लोकं आपल्या पोटापाण्याची सोय लावण्यासाठी, जाती-धर्माच्या नावावरून अनावश्यक गोष्टी करत असतात. अशा वक्तव्यांचा काहीच फरक पडत नाही. असा टोला नकवी यांनी ओवेसी यांना लगावला आहे.
मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते.