शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एमएसपी : केंद्र सरकारसाठी त्रासाचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 06:37 IST

Farmer Protest : लेखी आश्वासनास तयार, कायद्यात समावेश अडचणीचा

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) सरकार शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी लेखी आश्वासन द्यायला तयार असले, तरी त्याचा कायद्यात समावेश करणे, हा त्यांच्यासाठी त्रासदायक विषय बनला आहे. कारण, किमान आधारभूत किमतीत २३ पिके मोडत असली तरी गहू, तांदूळ व मकाच फक्त एमएसपीच्या दराने घेतला जातो. एवढेच काय पंजाब व हरियाणाबाहेर गहू व तांदळाचे जे एकूण उत्पादन होते, त्याच्या फक्त ८ ते १० टक्केच पीक केंद्र सरकार किमान आधारभूत भावाने घेते.

प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी तर ही टक्केवारी सहाच सांगितली आहे. त्याचा अर्थ पंजाब व हरियाणातील एकूण उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन असते. या पार्श्वभूमीवर किसान शेतकी फोरमचे निमंत्रक पुष्पेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर असलेल्या खासगी मंडयांनीदेखील फक्त किमान आधारभूत भावाने कृषीमाल विकत घेणे सरकारने बंधनकारक करावे.

अनेक अभ्यासांतून हे दिसले की, कृषीमाल हा फार क्वचित किमान आधारभूत भावाने विकला गेला. ही बाब सरकारची स्वत:ची भाव माहिती व्यवस्था ‘ॲगमार्केनेट’नेही सांगितली आहे. ॲगमार्केनेट देशातील सुमारे तीन हजार मंडयांतून भाव आणि कृषीमालाचे प्रमाण याची माहिती घेत असते. बहुसंख्य तोटा हा मका, भुईमूग आणि इतर पीक विक्रीतून झाला. उदा. कर्नाटकात ऑक्टोबरमध्ये बाजरी आणि मध्य प्रदेशमध्ये ज्वारी किमान आधारभूत भावापेक्षा अनुक्रमे ४५ व ५६ टक्के कमी दराने विकली गेली.

आधीच आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठीच्या अर्थसंकल्पात अन्न अनुदान हे अंदाजे दोन लाख ५३ हजार कोटी रुपये आहे व या रकमेत कोरोनामुळे जे परिणाम झाले, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत मोफत अन्न पुरवण्यासाठी खर्च झालेल्या एक लाख ५० हजार कोटी रुपयांचा समावेश नाही. शेतकरी कृषी उत्पादनाचा जो कोणता दाणा विकायला आणेल, त्याला जर किमान आधारभूत भाव द्यायची हमी देण्याचा निर्णय झाला तर अनुदानाची रक्कम किती होईल, याचा विचार करा. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गेल्या आठवड्यात आठ आश्वासने लेखी दिली होती. ते म्हणाले होते की, सरकार इतर सात आश्वासनांत किमान आधारभूत भावावर लेखी द्यायला तयार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर असलेल्या बाजारांवर राज्य सरकारे कर आकारू शकतात, असेही तोमर म्हणाले.

सरकार-शेतकऱ्यांमध्ये आज चर्चाकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात यापूर्वीही चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. तरीही तोडगा निघालेला नाही. सोमवारी सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी