शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

"काही लोक मत देतात तर काही कानाखाली"; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:56 IST

Kangana Ranaut : विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौतला झालेल्या मारहाणीवरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut On Kangana Ranaut : बॉलिवुड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगना रणौतवर गुरुवारी हल्ला झाला. दिल्ली एनडीच्या  बैठकीसाठी येत असताना चंदीगड विमानतळावर कंगना रणौतला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने कानाखाली मारल्याचे समोर आलं. कंगनाने याविरोधात विमानतळ पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानतंर कंगनाला कानाखाली मारणाऱ्या कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला कंगना रणौतबद्दल सहानुभूती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.

अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर सक्रिय राजकारणी म्हणून काम करण्यास सज्ज झाली आहे. मात्र गुरुवारी दिल्लीला जात असताना चंदिगड विमानतळावर तिला एका महिला जवानाने कानाखाली मारली. यानंतर कंगना रणौतने तक्रार केल्यावर कुलविंदर कौरलाला ताब्यात घेण्यात आले आणि तिला नोकरीवरून निलंबित करण्यात आले. चौकशीदरम्यान कुलविंदर कौरने सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रणौतच्या वक्तव्यामुळे ती दुखावली गेली होती. या घटनेवरुन संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले. काही लोक मतदान करतात तर काही लोक कानाखाली मारतात. खरंच काय झालं ते मला माहीत नाही. मी या प्रकरणात लक्ष घालेन आणि नंतर बोलेन, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी घडलेला प्रकार संजय राऊत यांना सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की," त्या महिला शिपाईने सांगितलं की तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. त्यामुळे आपल्या आईबाबत कुणी चुकीचं बोललं असेल राग येणं स्वाभाविकच आहे. पण खरं तर कोणीही कायदा हातात घेऊ नये. मात्र, त्या महिला शिपाईने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत माता तिची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते भारत मातेचे पुत्र होते. त्यामुळे जर कोणी भारत मातेचा अपमान केला असेल आणि त्यामुळे कोणाला राग आला असेल, त्याचा आपण विचार करायला हवा."

"मला कंगना रणौतबद्दल सहानुभूती आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे अशाप्रकारे खासदारांवर कोणीही हात उगारू नयेत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांचा सन्मानही राखला गेला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजूनही लोकांमध्ये किती संताप आहे हे या घटनेवरून दिसून येते," असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा