ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:37 IST2025-07-06T17:35:54+5:302025-07-06T17:37:03+5:30

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

MP News, joined police department, but didn't go on duty for 12 years; still got a salary of 28 lakhs | ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

MP Police News:मध्य प्रदेशपोलिस विभागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक कॉन्स्टेबल १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही, तरीदेखील त्याला २८ लाख रुपये पगार मिळाला. हे प्रकरण विदिशा जिल्ह्यातील असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या निष्काळजीपणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

सविस्तर माहिती अशी की, संबंधित पोलिस कॉन्स्टेबल २०११ मध्ये मध्य प्रदेश पोलिसात भरती झाला होता. भरतीनंतर त्याला भोपाळ पोलिस लाईनमध्ये तैनात करण्यात आले होते. पुढे सागर ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आले. परंतु प्रशिक्षणाला पोहोचण्याऐवजी तो त्याच्या घरी निघून गेला अन् परतलाच नाही. त्याने जाण्यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याला माहिती दिली नाही किंवा रजेसाठी अर्ज केला नाही. त्याची सर्व्हिस फाइल स्पीड पोस्टने भोपाळला पाठवली गेली, तिथे कोणत्याही चौकशीशिवाय फाईल स्वीकारण्यात आली.

१२ वर्षे कोणालाही पत्ता लागला नाही
विशेष म्हणजे, प्रशिक्षण केंद्रातील कोणत्याही अधिकाऱ्याला अनुपस्थितीबद्दल माहिती समजले नाही किंवा त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. अशाप्रकारे, त्याला वर्षानुवर्षे पगार मिळत राहिला. फुकट पगार मिळत होता, त्यामुळे त्यानेही इतक्या वर्षात पोलिस विभागाला याबाबत माहिती दिली नाही. 

कसा उघडकीस आला
२०२३ मध्ये २०११ च्या बॅचचा पे ग्रेड रिव्ह्यू सुरू असताना हा घोटाळा उघडकीस आला. अधिकाऱ्यांना त्या कॉन्स्टेबलची कोणतीही फाईल किंवा सर्व्हिस रेकॉर्ड सापडला नाही. जेव्हा त्याला बोलावण्यात आले, तेव्हा त्याने दावा केला की, तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे, म्हणून ड्युटीवर येऊ शकत नाही. त्याने काही वैद्यकीय कागदपत्रे देखील दाखवली.

प्रशिक्षणासाठी आलाच नाही
तपासाची जबाबदारी भोपाळच्या टीटी नगर भागात तैनात असलेल्या एसीपी अंकिता खटारकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की कॉन्स्टेबलने प्रशिक्षणाला जाण्याची परवानगी घेतली होती, परंतु तो कधीही परतला नाही. या कारणास्तव त्याची उपस्थिती नोंदवण्यात आली नाही, अन् तो रेकॉर्डमध्ये राहिला.

काय कारवाई केली?
सध्या, कॉन्स्टेबलला भोपाळ पोलिस लाईनमध्ये ठेवण्यात आले असून, त्याच्याकडून १.५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम त्याच्या येणाऱ्या पगारातून वजा केली जाईल. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे आणि या निष्काळजीपणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.

Web Title: MP News, joined police department, but didn't go on duty for 12 years; still got a salary of 28 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.