मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर शासकीय कार्यक्रमात मंचावरून कोसळले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 21:03 IST2021-07-01T21:02:02+5:302021-07-01T21:03:09+5:30
Pradhuman Singh Tomar : नेतेमंडळी असलेला हा मंच जवळपास 10 फूट रूंद होता. ज्यावर जवळपास 25 जण बसलेले होते.

मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर शासकीय कार्यक्रमात मंचावरून कोसळले अन्...
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका शासकीय कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradhuman Singh Tomar ) मंचावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. तोमर या ठिकाणी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान, ते मंचावरून खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्याचे मंत्री भारत सिंह कुशवाह, खासदार विवेक शेजवलकर, वरिष्ठ नेते प्रभात झा यांची मंचावर उपस्थिती होती.
नेतेमंडळी असलेला हा मंच जवळपास 10 फूट रूंद होता. ज्यावर जवळपास 25 जण बसलेले होते. याचवेळी मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा तोल गेल्याने ते अचानक खाली पडले व त्यांना थोडा मुका मार लागल्याची माहिती मिळत आहे. प्रद्युम्न तोमर मंचावरून खाली पडताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थिते नेते व कार्यकर्ते त्यांना उचलण्यासाठी त्यांच्याकडे तत्काळ धावले होते. प्रद्युम्न सिंह तोमर कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.