खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी.डी. मार्गावर भीषण अपघात, थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 14:26 IST2024-02-19T13:24:26+5:302024-02-19T14:26:20+5:30
MP Hemant Godse: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी. डी. रोड येथे भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने हेमंत गोडसे आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहकारी या अपघातातून बचावले आहेत.

खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी.डी. मार्गावर भीषण अपघात, थोडक्यात बचावले
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी. डी. रोड येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातातहेमंत गोडसे यांच्या कारच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने हेमंत गोडसे आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहकारी या अपघातातून बचावले आहेत. हेमंत गोडसे यांच्या कारला हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेमंत गोडसे हे २०१४ पासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून लढवताना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदेंसोबत शिंदे गटामध्ये गेले होते.