शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 9:54 AM

मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंनीही या प्रकारावरून कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहेमध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे.

मुंबईः मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडल्यानं शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंनीही या प्रकारावरून कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे. स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार, असंही ट्विट करत उदयनराजे म्हणाले आहेत. ट्विटच्या शेवजी जय शिवराज असंही उदयनराजेंनी नमूद केलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते, मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते, असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे. त्याचसोबत शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का?, त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल महाराष्ट्र भाजपानं उपस्थित केला आहे. आता संभाजीराजे छत्रपतींनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले