शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: कामावर न आल्यानं मालकानं तरुणाला चाबकानं फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 10:03 IST

मालकाकडून अमानुष मारहाणीचं चित्रीकरण

होशंगाबाद: कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सुट्टी घेतली म्हणून पेट्रोल पंप चालकानं कर्मचाऱ्याला चाबकानं मारहाण केल्याची घटना मध्यप्रदेशातील होशंगाबादमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोल पंप चालकानं या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ तयार केला आहे. होशंगाबादच्या रायपूरचा रहिवासी असलेला अजय अहिरवार शिवनंदी पेट्रोल पंपवर काम करायचा. काही दिवसांपूर्वी अजयचा अपघात झाल्यानं तो कामावर येऊ शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या पेट्रोल पंप चालकानं त्याला पेट्रोल भरायच्या मशिनला बांधून मारहाण केली. रायपूरला राहणाऱ्या अजयचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यामुळे 5 ते 6 दिवस त्याला कामावर येता आलं नाही. अजय कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर राहिल्यानं पेट्रोल पंप चालक भडकला. चालकानं त्याच्या एका साथीदाराला अजयच्या घरी पाठवलं. त्यानंतर अजयला पेट्रोल पंपवर आणण्यात आलं आणि त्याला पेट्रोल भरण्याच्या मशीनला बांधलं. अजयला चाबकानं बेदम मारहाण करण्यात आली. जवळपास 10 मिनिटं अजयला निर्दयीपणे चाबकानं फोडून काढण्यात आलं. या अमानुष मारहाणीचं चित्रणदेखील पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आलं. यानंतर अजयनं कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि घाबरुन स्वत:च्या गावी निघून गेला.

अजयला मारहाण करणाऱ्यांची नावं दीपक साहू आणि चिंटू साहू असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ मिळताच पोलिसांनी दीपक आणि चिंटूला अटक केली. या दोघांनी ज्या चाबकानं अजयला मारहाण केली, तो चाबूक पोलिसांनी जप्त केला आहे. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपMadhya Pradeshमध्य प्रदेशDalit assaultदलितांना मारहाण