धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:05 IST2025-05-13T14:04:34+5:302025-05-13T14:05:13+5:30
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यक्रमादरम्यान चालत असताना खासदार अजय मंडल यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडले.

धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंगळवारी एक दिवसाच्या दौऱ्यावर भागलपूरला आले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यक्रमादरम्यान चालत असताना खासदार अजय मंडल यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं उघड झालं आहे. मांडीलाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार अजय मंडल यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथून त्यांनी पुन्हा एका खासगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं.
'खेलो इंडिया'च्या समारोप समारंभासाठी नितीश कुमार पोहोचले होते. त्यांच्यासोबत अजय मंडल हे देखील यावेळी उपस्थित होते. अजय मंडल यांचा तोल गेल्यावर ते खाली पडताच आजूबाजूचे लोक त्याच्याकडे धावले. सँडिस कंपाउंड येथील बॅडमिंटन कोर्टमध्ये 'खेलो इंडिया युथ गेम्स २०२५' आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील तरुण खेळाडूंशी संवाद साधला. त्याला प्रोत्साहन दिले.
मुख्यमंत्री नीतीश कुमार के कार्यक्रम में सांसद अजय मंडल अचानक गिर गये , अजय मंडल भागलपुर के सांसद है गिरने के बाद उनके पाव में फ्रैक्चर की खबर है . #NitishKumar#Biharpic.twitter.com/o0IGFJyjie
— Prince Gupta ( Journalist ) (@Broudprince) May 13, 2025
कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकूण २०८ कोटी ६५ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ३२ योजनांचे उद्घाटन केले आणि १६ योजनांची पायाभरणी केली. अशाप्रकारे, त्यांनी एकूण ४८ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करून भागलपूरच्या लोकांना एक भेट दिली.
मुख्यमंत्री जगदीशपूर ब्लॉकच्या खिरीबांध पंचायतीच्या मुखेरिया गावात पोहोचले, जिथे त्यांनी माध्यमिक शाळा मुखेरिया येथे डॉ. आंबेडकर समग्र सेवा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या विशेष शिबिरात महिला लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शाळेच्या परिसरात डॉ. आंबेडकर समग्र सेवा अभियानांतर्गत उभारलेल्या २२ सेवांच्या स्टॉलचीही पाहणी केली.