शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 21:50 IST

कमलनाथ यांचा भाजपाला धक्का

भोपाळ: कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला आहे. राज्य सरकारनं विधानसभेत सादर केलेल्या एका विधेयकाच्या बाजूनं भाजपाच्या दोन आमदारांनी मतदान केलं. विशेष म्हणजे मतदानावेळी भाजपाचे इतर सर्व आमदार अनुपस्थित होते. यानंतर भाजपानं दोन आमदारांवर टीका केली. आता या आमदारांना काँग्रेसनं अज्ञातस्थळी हलवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कमलनाथ त्यांची भेट घेणार आहेत. विधानसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या भाजपा आमदारांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मेहर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण त्रिपाठी आणि ब्योहारीचे आमदार शरद कौल यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूनं मतदान केल्यानं त्यांच्यावर स्वपक्षानं टीका केली. यानंतर त्रिपाठींनी भाजपाला लक्ष्य केलं. भाजपा कायम खोटी आश्वासनं देते. मला मेहरचा विकास करायचा असून मी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.शरद कौल यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. मी आधी काँग्रेसमध्येच होतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये गेल्यास ती घरवापसीच असेल, अशा शब्दांमध्ये कौल यांनी सूचक भाष्य केलं. भाजपाचे हे दोन बंडखोर आमदार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. तसं झाल्यास राज्यात भाजपाला धक्का बसेल. 

आज नेमकं काय घडलं?विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.  काल काय म्हणाले होते भाजपा नेते?भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील काँग्रेस सरकार कोसळू शकतं, असे संकेत काल दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सपा-बसपामधील अंतर्गत लाथाळ्यांचा उल्लेख केला होता. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस