शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:14 PM

Gautam Gambhir Jan Rasoi : सर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई'

ठळक मुद्देसर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई'डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आली होती पहिली जन रसोई

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीतील न्यू अशोक नगर या भागात जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली आहे. यापूर्वीही त्यांनी एका जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली होती. गौतम गंभीर यांनी गेल्या वर्षी २४ डिसेंबर २०२० रोजी आपल्या भागात जन रसोईची सुरूवात केली होती. गौतम गंभीर फाऊंडेशनद्वारे लोकांना या ठिकाणी केवळ एका रूपयात पोटभर जेवण उपलब्ध करून देण्यात येतं. दिल्लीत आतापर्यंत दोन ठिकाणी जन रसोई या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं. डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवातगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जातं. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते.  यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरdelhiदिल्लीBJPभाजपाfoodअन्न