शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महागणार, नवीन कलम होणार समाविष्ट - इरडाईची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 5:16 AM

मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि  ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे.

नवी दिल्ली : वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महाग होणार आहे. भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणाने (इरडाई) यासंबंधीची शिफारस केली आहे.मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि  ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाने कितीही रकमेचे विमा संरक्षण घेतले असले तरी त्याच्या वाहन चालविण्याच्या सवयींचा विम्याच्या हप्त्यावर परिणाम होईल. जे लोक असुरक्षितरीत्या वाहन चालवतील, त्यांना सुरक्षित वाहन चालविणाऱ्यांपेक्षा जास्त विमा हप्ता पडेल.

सूत्रांनी सांगितले की, दारू पिऊन  वाहन चालविल्यास १०० अंक चालकाच्या खात्यावर पडतील तसेच चुकीच्या पार्किंगसाठी १० अंक पडतील. ज्यांचे अंक २०च्या खाली असतील, त्यांना अतिरिक्त हप्ता पडणार नाही. मात्र, २१ पासून पुढच्या अंकांसाठी दंडात्मक हप्ता सुरू होईल. दुचाकी वाहनांसाठी तो १०० ते ७५० रुपये आणि चारचाकी व व्यावसायिक वाहनांसाठी ३०० ते १,५०० रुपये असेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी