शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Shambhavi Pathak : लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरंच; पायलट शांभवी पाठकच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:13 IST

Shambhavi Pathak : शांभवीची आई आता महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात आपल्या लेकीला गमावल्याच्या दुःखाने पूर्णपणे कोलमडून गेली आहे.

२५ वर्षीय शांभवी पाठक ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या 'व्हीएसआर व्हेंचर्स'च्या 'लिअरजेट ४५' विमानातील पायलट टीमचा भाग होती. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर हे विमान लँडिंगच्या काही मिनिटं आधीच कोसळलं. या भीषण अपघातात शांभवी पाठक आणि अजित पवारसह पाच जणांचा मृत्यू झाला.

दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेवमध्ये बुधवारी रात्रीपासूनच शोकाकुल वातावरण पाहायला मिळालं. कॅप्टन शांभवी पाठकच्या घराबाहेर शांतता आहे. ज्या आईच्या डोळ्यांत मुलीच्या लग्नाची स्वप्नं होती, तीच आई आता महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात आपल्या लेकीला गमावल्याच्या दुःखाने पूर्णपणे कोलमडून गेली आहे.

लग्नाविषयी बोलणीही सुरू

शांभवीची आई 'एअर फोर्स बाल भारती स्कूल'मध्ये शिक्षिका आहेत, त्यांना स्वतःला सावरणं कठीण झालं आहे. वडील निवृत्त लष्करी पायलट असून अपघाताची बातमी मिळताच ते पुण्याला रवाना झाले. हे दाम्पत्य आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबात लग्नाविषयी बोलणीही सुरू झाली होती. शांभवीचा धाकटा भाऊ २२ वर्षांचा आहे.

"अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण..."; पिंकीच्या आईचा टाहो

"शांभवी अत्यंत साधी, शांत आणि गोड स्वभावाची"

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या शिल्पी यांनी शांभवीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "शांभवी अत्यंत साधी, शांत आणि गोड स्वभावाची होती. दीड महिन्यापूर्वी ती शेवटची पार्लरमध्ये आली होती. तिची आई तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा विचार करत होती. मी तर माझ्या कॅनडात राहणाऱ्या मुलासाठीही तिचा विचार केला होता. त्या कुटुंबाशी माझं भावनिक नातं होतं."

 "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

"अत्यंत संवेदनशील मुलगी"

गेल्या ४० वर्षांपासून परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र यांनी सांगितलं की, "शांभवी मला जेव्हा जेव्हा पाहायची, तेव्हा आवर्जून नमस्कार करायची. हे संपूर्ण कुटुंब सर्वांशी सन्मानाने वागायचं आणि सामाजिक कार्यक्रमांतही उत्साहाने सहभागी व्हायचं." वडिलांची गाडी धुणाऱ्या व्यक्तीनेही शांभवी ही एक अत्यंत संवेदनशील मुलगी होती, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण

मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं

शांभवी २०२२ पासून 'व्हीएसआर व्हेंचर्स'मध्ये 'फर्स्ट ऑफिसर' म्हणून कार्यरत होती. तिने 'एअर फोर्स बाल भारती स्कूल'मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊन कमर्शियल पायलट लायसन्स मिळवलं. मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्समध्ये बीएससीचे शिक्षणही पूर्ण केलं होतं. तिच्याकडे 'फ्रोजन एटीपीएल'सह अनेक विमान प्रमाणपत्रं होती. शांभवीने स्वतःच्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं होतं. तिच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilot Shambhavi's wedding dream shattered; mother's heartbreaking lament.

Web Summary : Pilot Shambhavi Pathak, part of the team on a flight that crashed, tragically died. Her family, preparing for her wedding, is devastated. Friends remember her kindness. The community mourns the loss of a talented and respectful young woman.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेसdelhiदिल्ली