शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी ! मुलाच्या हव्यासापोटी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:02 IST

आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली आहे.

ठळक मुद्देआपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटकमुलगा झाला नाही या रागातून महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची पोलिसांची माहितीपोलिसांनी महिलेला अटक केली आहे

गाजियाबाद - आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, मुलगा झाला नाही या रागातून महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 

'आरती या महिलेने तीन महिन्यांपुर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगा न झाल्याने तिची प्रचंड चिडचिच होत होती. तिला स्वत:चा राग येत होता', अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश तोमर यांनी दिली आहे. 

'रविवारी महिलेने उशीच्या सहाय्याने मुलीचं तोंड दाबून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता', असं आकाश तोमर यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'सुरुवातीला महिलेने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. पण कसून चौकशी केल्यानंतर आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली तिने दिली'. 

महिलेच्या कुटुंबाने आपण कधीही मुलासाठी तिच्यावर दबाव टाकला नसल्याचा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तपास सुरु आहे. 

आईनेच चार वर्षाच्या मुलीली दिली गरम तव्यावर बसण्याची शिक्षाआईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली असल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली होती. हैदराबादमधील एसआर नगरमध्ये ही घटना होती. यानंतर आई व तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. ललिता व तिचा साथीदार एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. ललिता स्वयंपाकी म्हणून काम करते तर तिचा साथीदार वॉचमनचं काम करतो. हॉस्टेलमध्ये खेळतं असताना मुलीकडून एका व्यक्तीच्या लॅपटॉपचं नुकसान झालं. त्या व्यक्तीने याबद्दलची ललिताकडे तक्रार केल्यावर ललिताने चिमुरडीला मारहाण केली. पीडित मुलीला इजा झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे