अस्सं सासर सुरेख बाई! सासूकडून लाडक्या सुनेला 11 लाखांची कार गिफ्ट; हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:34 IST2022-02-08T14:32:21+5:302022-02-08T14:34:38+5:30

एका सासूची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने सुनेना भलं मोठं गिफ्ट दिलं आहे.

mother in law gifted a car worth rs 11 lakh to daughter in law in jhunjhunu | अस्सं सासर सुरेख बाई! सासूकडून लाडक्या सुनेला 11 लाखांची कार गिफ्ट; हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया

अस्सं सासर सुरेख बाई! सासूकडून लाडक्या सुनेला 11 लाखांची कार गिफ्ट; हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया

नवी दिल्ली - लग्नामध्ये अनेकदा आजही हुंडा दिला जातो. हुंड्यापायी कित्येक मुलींचा सासरी प्रचंड छळ केला जातो. पैशांसाठी तिला मारहाण केली जाते. अशातच आता एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका सासूची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने सुनेना भलं मोठं गिफ्ट दिलं आहे. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये ही घटना घडली असून गावकरी सासूची खूपच स्तूती करत आहेत. बुहाना परिसरातील खांदवामधील कृष्णा देवी नावाच्या महिलेने चेहरा दाखवण्याच्या विधीवेळी आपल्या लाडक्या सुनेला तब्बल 11 लाखांची कार गिफ्ट म्हणून दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामकिशन यादव यांचा एकुलता एक मुलगा रामवीरचं पाच फेब्रुवारी रोजी अलवरच्या खुवाना गावातील ईशासोबत लग्न झालं. लग्नानंतर ईशा जेव्हा सासरी आली. तेव्हा सासूने चेहरा दाखवण्याच्या विधीवेळी तिला 11 लाखांची कार भेट दिली. तसेच या कुटुंबाने लग्नात हुंडा देखील घेतला नाही. फक्त एक रुपया आणि नारळ घेतला. नवरदेव रामवीर एमएससी आणि नवरी ईशा बीएच्या सेंकड ईअरची विद्यार्थिनी आहे. कार गिफ्ट मिळताच नवरी हैराण झाली आहे. तिला खूप आनंद झाला असून नव्या घरातील तिच्या स्वागतामुळे ती खूपच खूश आहे. 

सुनबाई घरी आली तेव्ही कारची चावी तिच्या हातात दिली

रामकिशन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आधीपासूनच ठरवलं होतं की, मुलाच्या लग्नात हुंडा घ्यायचा नाही. तसेच पत्नीचा हट्ट होता की सुनेला कार गिफ्ट करायची. त्यांनी ही गोष्ट आधी कोणालाच सांगितली नाही. थेट सरप्राईझ दिलं. जेव्हा सुनबाई घरी आली तेव्ही कारची चावी तिच्या हातात देऊन तिला आश्चर्याचा धक्का दिला. उपस्थित असलेले सर्वच लोक देखील हे पाहत बसले. त्यांनी आनंदाने ताळ्या वाजवल्या. रामकिशन आणि कृष्णा देवी यांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये हुंडा न घेऊन समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother in law gifted a car worth rs 11 lakh to daughter in law in jhunjhunu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.