शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिक्षणासाठी पंजाब, महाराष्ट्राचे सर्वाधिक विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 10:50 IST

जर्मनी, किर्गीस्तान, आयर्लंड, रशिया आणि फ्रान्सला जाण्याकडे अधिक कल

नवी दिल्ली : पंजाब, तेलंगणा व महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जातात. हे विद्यार्थी जर्मनी, किर्गीस्तान, आयरलँड, रशिया व फ्रान्समध्ये शिक्षण घेणे जास्त पसंत करतात, अशी माहिती एका अहवालात पुढे आली आहे.

बियॉन्ड बेड्स अँड बाऊंड्रिज : इंडियन स्टुडंट मोबिलिटी रिपोर्ट-२०२३ जारी करण्यात आला असून, यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व आस्ट्रेलियावर विशेष लक्ष देण्याबरोबरच विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेवरही प्रकाश टाकला आहे.

या अहवालानुसार, २०१९मध्ये सुमारे १०.९ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले. २०२२मध्ये ही संख्या १३.२४ लाख झाली. विदेशी  शिक्षण घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सध्या १५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २०२५मध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या २० लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. 

पारंपरिक रूपाने भारतीय विद्यार्थी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलियासारख्या देशांना प्राधान्य देताना दिसतात. परंतु अलीकडच्या काळात जर्मनी, किर्गीस्तान, आयर्लंड, सिंगापूर, रशिया, फिलीपाइन्स, फ्रान्स व न्यूझीलंड भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

इतर राज्यांचे प्रमाणही लक्षणीय

विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राज्यवार संख्येत पंजाब, तेलंगणा व महाराष्ट्र आघाडीवर आहेत. विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत पंजाबचे १२.५ टक्के, आंध्र / तेलंगणाचे १२.५ टक्के, महाराष्ट्राचे १२.५ टक्के, गुजरातचे ८ टक्के, दिल्ली / एनसीआरचे ८ टक्के, तामिळनाडूचे ८ टक्के, कर्नाटकचे ६ टक्के व इतर राज्यांचे ३३ टक्के विद्यार्थी आहेत. (वृत्तसंस्था)

विदेशातील शिक्षणाचा खर्च वेगाने वाढणार

-अहवालात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदेशात जाऊन शिक्षण घेण्यावर होणाऱ्या खर्चात वेगाने वाढ होणार आहे. -२०२५मध्ये सुमारे ७० अब्ज अमेरिकी डॉलर यावर खर्च होण्याची शक्यता आहे. -२०२९मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशी शिक्षणावर ३७ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केले.-२०२२मध्ये यात ९ टक्के वाढ झाली व हा खर्च ४७ अब्ज डॉलरपर्यंत गेला.-दरवर्षी या खर्चात १४ टक्के वाढीची शक्यता आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण