Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला डास, महापौरांनी मारला; योगी आदित्यनाथ म्हणाले,"...यावर उपाय करावे लागतील"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 08:44 IST2021-11-12T08:43:40+5:302021-11-12T08:44:45+5:30
Yogi Adityanath : राज्यात कोरोना कमी होत असतानाच आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी मुख्यमंत्री कानपूरला पोहोचले होते.

Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला डास, महापौरांनी मारला; योगी आदित्यनाथ म्हणाले,"...यावर उपाय करावे लागतील"
कानपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान कानपूरला पोहोचले असता येथील एक डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यामुळे परिस्थिती अधिकाऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी झाली होती. मात्र, हा डास महापौरांनी तातडीने मारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवत सांगितले की, हे डास असे मरणार नाहीत, त्यांच्यावर उपाय करावे लागतील. दम्यान, राज्यात कोरोना कमी होत असतानाच आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी मुख्यमंत्री कानपूरला पोहोचले होते.
महापालिकेचा पर्दाफाश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व प्रशासकीय कर्मचारी तीन दिवस बंदोबस्तात व्यस्त होते. मुख्यमंत्र्यांसमोर कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते, मात्र एका डासाने येथील महापालिकेचा पर्दाफाश केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने डास मारण्यासाठी संपूर्ण मार्गावर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले होते. महापालिका, स्मार्ट सिटी ऑफिस आणि केडीएमध्ये एकही डास येऊ नये म्हणून प्रत्येक भाग स्वच्छ केला, तरीही डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले.
महापौरांनी डास लगेच मारला
दरम्यान, मुख्यमंत्री जेव्हा स्मार्ट सिटी मिशन कार्यालयात झिका व्हायरससंदर्भातील नियंत्रण कक्ष पाहण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे, औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना आणि वैद्यकीय आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह हे महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले. त्यावेळी एक डास मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. हा डास पाहताच महापौरांनी त्याला मारला. यावर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आले नाही आणि डास असे मरणार नाहीत, त्यांच्यावर उपाय करावे लागतील, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांपर्यंत डास पोहोचल्याची बातमी व्हायरल
कानपूर शहरासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या डेंग्यूचा कहर थांबत नाही आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांना फॉगिंग आणि साफसफाईच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत. पण कानपूरमध्ये लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत डास पोहोचल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करत आहेत. याला स्वच्छतेच्या दुरवस्थेशी जोडून लोक महापालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
झिका व्हायरस कशामुळे होतो?
झिका हा आजार एडीस एजिप्ती नावाच्या डास चावल्याने हे वायरल इन्फेक्शन होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यातही हा डास आधी इन्फेक्टेड असेल आणि तो जर चावला तर त्यातून हा आजार होत असतो. डेंग्यू व्हायरसप्रमाणेच याची लक्षणे दिसून येतात. आफ्रिकेमधून हा आजार भारतात आल्याचे म्हटले जाते. ज्या डासामध्ये याचा प्रसार झालेला असतो, तो डास माणसाला चावल्यास त्यातून या आजाराची लागण होत असते. हे वायरल इन्फेक्शन असल्याने त्यावर वेगळे असे उपचार काहीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फवारणी करणे, पाणी साचू न देणे आदी उपाय करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.