शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचण्यांत पुरुषांपेक्षा महिला स्वयंसेवक अधिक; भारत लसीचे मोठे उत्पादन केंद्र बनणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:21 IST

एम्सचे डॉ. संजय राय यांची मुलाखत

- एस.के. गुप्तानवी दिल्ली : भारत कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचे जगातील मोठे केंद्र बनणार आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असणार आहे. या मानवी चाचण्या सुरू झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष सहा आठवड्यांच्या आत हाती येतील, असे एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.देशामध्ये कोरोनाची लस बनविण्यासाठी संशोधन सुरू आहे. या लसीच्या मानवी चाचण्या पार पडण्याची जबाबदारी एम्सने डॉ. संजय राय यांच्यावर सोपविली आहे. लसीच्या परीक्षणासंदर्भात त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव या संशोधनासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.

कोरोना लस बनविण्याच्या प्रयोगात एम्सची भूमिका किती महत्त्वाची आहे, या प्रश्नावर डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशातील एम्ससह १२ संस्था कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या घेणार आहेत. भारतात रुग्णांना देण्यात येणाऱ्या लसीच्या नमुन्याचे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे.  मानवी चाचण्यांच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात देशामध्ये १,१२५ जणांना ही लस टोचण्यात येईल. त्यातील ३७५ लोकांवर एम्सकडून आणखी प्रयोग केले जातील. या मानवी चाचण्यांच्या पहिल्या दोन टप्प्यांची प्रक्रिया सहा आठवडे चालेल. त्यानंतरच मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू होईल.

या चाचण्यांचे सुरुवातीचे निष्कर्ष सकारात्मक आले व या चाचण्या वेगाने जरी पार पाडल्या तरी ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान सहा महिने लागतील. त्याआधी अन्य कोणीही कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढली, तर भारत हा त्या लसीचा सर्वात मोठा उत्पादक देश बनू शकतो. ते म्हणाले की, भारतातील कोरोना विषाणू हा इतर देशांतील कोरोना विषाणूपेक्षा कमी घातक आहे. त्यामुळेच भारतातील मृत्यूदर कमी आहे, असे काही तज्ज्ञ म्हणत आहेत. मात्र, भारतातील कोरोना विषाणू कमी घातक आहे, असा एकही पुरावा अद्याप आम्हाला मिळालेला नाही.

डॉ. संजय राय यांनी सांगितले की, केंद्रीय औषध नियंत्रकांनी देशातील दोन कंपन्यांना सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक व झायडस कॅडिला, अशी त्या दोन कंपन्यांची नावे आहेत. एकाही विदेशी कंपनीला त्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या भारतात करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मानवी चाचण्या या सुरक्षित व परिणामकारक पद्धतीने पार पाडाव्या लागतात.

शरीरात लस टोचल्यानंतर विषाणूशी लढण्याकरिता अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार होतात, याचे निरीक्षण केले जाते. जर अँटिबॉडी तयारच होत नसतील, तर मग त्या प्रयोगांना काहीच अर्थ उरणार नाही. मग लसीच्या प्रयोगांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. लसीच्या प्रयोगांमध्ये असे काही वेळा होत असते.

असे निवडले जातात मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवक

मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवक निवडले जातात, त्या प्रक्रियेबद्दल एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, मानवी चाचण्यांसाठी १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व कोणताही आजार नसलेल्या व्यक्ती स्वयंसेवक म्हणून निवडल्या जातात. त्यांना प्रयोगात सामील करून घेण्यापूर्वी त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांकरिता निवडलेल्या स्वयंसेवकांना या लसीचा पहिला लहान प्रमाणातील डोस गुरुवारपासून देण्यास सुरुवात झाली. ५० लोकांना लसीचा कमी प्रमाणातील डोस, तर काही जणांना डबल डोस देण्यात येईल. त्यानंतर १४ दिवसांनी या व्यक्तींच्या शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या याचे परीक्षण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. कारण अँटिबॉडीज तयार होण्यासाठी २ ते ४ आठवड्यांचा वेळ लागतो. ज्या वैद्यकीय संस्थांमध्ये क्लिनिकल फार्माकॉलॉजी विभाग आहे, अशाच १२ संस्थांना इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या मानवीचाचण्या करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

10,000 लोकांनी एम्सकडे केले अर्ज

कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे, असे एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय म्हणाले. त्यांनी सांगितले की, लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये स्वेच्छेने सामील होण्यासाठी आठ ते दहा हजार लोकांनी दिल्लीतील एम्सकडे अर्ज केले आहेत. त्यातील साडेतीन हजार लोकांना आम्ही ई-मेलद्वारे उत्तर दिले, तर अन्य 10 ते 15 % लोकांना आम्ही व्हॉटस्अ‍ॅपवरून किंवा दूरध्वनी करून उत्तर दिले.

‘कोरोना विषाणूत मोठे बदल झाले नाहीत’

कोरोना विषाणूच्या स्वरूपात वारंवार बदल होतात, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्या शोधल्या जात असलेल्या लसी किती परिणामकारक ठरतील, या प्रश्नावर डॉ. संजय राय यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या स्वरूपात कोणतेही मोठे बदल आढळून आलेले नाहीत. या विषाणूने सहा सात वेळा आपले स्वरूप बदलले, असे म्हटले जात आहे. इतके कमी बदल इन्फ्लुएंझासारख्या मोठ्या संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंतच आढळून येतात. कोरोना विषाणूबद्दल सध्या जे बोलले जात आहे, त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत