शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 13:46 IST

Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Gujarat Morbi Bridge Collapse:गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. दुर्घटनेवेळी पुलावर जवळपास 500 लोक होते. यातील अनेकांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेवेळी एका तरुणाने मोठे शौर्य दाखवत 60 लोकांचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, दुर्घटनेवेळी हा तरुण त्या पुलावरच होता.

60 लोकांचा जीव वाचवला30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला ऐतिहासिक पूल अचानक नदीत कोसळला. अपघाताच्या पाच दिवसांपूर्वीच हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवार असल्याने पुलावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी अचानक पूल तुटल्याने सगळे नदीत पडले. यावेळी पुलावर असलेल्या नईम शेख नावाच्या जीगरबाज तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालत सूमारे 60 लोकांचा जीव वाचवला.नईम मित्राला वाचवू शकला नाहीअपघातात नईम स्वतःही जखमी झाला होता. पण, त्याने आपल्या मित्रांसह 50-60 लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अपघातातील जखमींना सध्या मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नईमदेखील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. नईमने सांगितले की, अपघाताच्या वेळी तो त्याच्या 5 मित्रांसह पुलावर उपस्थित होता. या घटनेत त्याच्या एका मित्राचाही मृत्यू झाला. 

राज्यभरात दुखवटा जाहीरगुजरात सरकारने मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शोक जाहीर केला आहे. या दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 2 नोव्हेंबर रोजी राज्यात राष्ट्रीय ध्वज अर्धवट राहील आणि कोणताही सरकारी समारंभ होणार नाही.

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरातAccidentअपघातDeathमृत्यू