शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोरॅटोरिअमची सुनावणी १८ नोव्हेंबरला; एनपीएची स्थगिती उठविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 1:42 AM

Supreme Court : रिझर्व्ह बँकेने न्यायालयाला एनपीए जाहीर करण्यास स्थगितीबाबत दिलेला अंतरिम आदेश उठविण्याची विनंती केली आहे. 

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या कालावधीत कर्जाच्या हप्ते वसुलीस तहकुबी दिल्यानंतर (मोरॅटोरिअम) त्या काळामध्ये व्याजावर व्याज आकारण्याच्या बँकांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आता १८ नोव्हेंबर राेजी ठेवली आहे. दरम्यान या सुनावणीच्या वेळी रिझर्व्ह बँकेने न्यायालयाला एनपीए जाहीर करण्यास स्थगितीबाबत दिलेला अंतरिम आदेश उठविण्याची विनंती केली आहे. न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होती. खंडपीठाने पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले. याआधीच्या सुनावणीच्या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे  व्यस्त असल्याने सुनावणी पुढे ढकलली होती. दि. ३ रोजी केंद्र सरकारने शपथपत्रांत दोन कोटीपर्यंत कजर्दारांना जे चक्रवाढ व्याज बँकांनी लावले आहे, त्यामधून रक्कम वजा करून जादाची रक्कम कर्जदारांना परत करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेची विनंती कोरोनासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान कर्जाचे  हप्ते भरू न शकणाऱ्या कर्जदारांना सरकारने मोरॅटोरिअम जाहीर करून दिलासा दिला होता. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी जी कर्जखाती थकीत (एनपीए) जाहीर केलेली नाहीत त्यांची घोषणा करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती लावली आहे.  या स्थगितीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्या कामकाजामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयbankबँकbusinessव्यवसाय