शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये मान्सून ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:53 IST

Monsoon: मालदीव, बंगालच्या उपसागराच्या काही भागांत गुरुवारी मान्सून आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्यासारखी स्थिती आहे.

नवी दिल्ली : देशात यंदा मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता होती; पण यास चक्रीवादळामुळे मान्सून चोवीस तास आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.मालदीव, बंगालच्या उपसागराच्या काही भागांत गुरुवारी मान्सून आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्यासारखी स्थिती आहे. तौउते व त्यानंतर काही दिवसांनी यास चक्रीवादळाने भारताला तडाखा दिला होता. पश्चिम बंगाल, ओडिशात यासमुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र, त्यातून झालेली चांगली गोष्ट म्हणजे मान्सूनचे देशात एक दिवस लवकर आगमन होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्येही संततधारयास चक्रीवादळ आता क्षीण झाले असून, बिहार व उत्तर प्रदेश परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या चार राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करीत रेड अलर्टचा इशाराही दिला होता. बिहार, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपीटही झाली. या राज्यांत नागरिकांनी सावधानता बाळगावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. 

पूर्व रेल्वेच्या १५ गाड्या रद्दn यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमधील जनजीवनावर परिणाम झाला आहे. पूर्व मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. n तिथे चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून रेल्वे रुळांवर पडली आहेत, तसेच काही ठिकाणी रुळांखाली माती वाहून गेली आहे. त्यामुळे पूर्व रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत. n सोनपूर, समस्तीपूर भागामध्ये रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यामध्ये जयप्रभा सेतूचा काही भाग कोसळल्याने उत्तर प्रदेश-बिहारमधील रेल्वे वाहतूक काही काळ थांबविण्यात आली आहे. बलिया येथे बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.  

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसweatherहवामानIndiaभारत