शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

मॉन्सूनची कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक; गोव्याच्या नजीक येऊन ठेपला मॉन्सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:29 IST

निसर्ग चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस केरळमध्येच थबकला मॉन्सून..

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस केरळमध्येच थबकलेल्या मॉन्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेने आज जोरदार वाटचाल करीत थेट कर्नाटकातील किनारपट्टीवरील कारवारपर्यंत धडक मारल्याचे हवामान विभागानेगुरुवारी जाहीर केले आहे. मॉन्सूनने संपूर्ण केरळ, कर्नाटकाचा काही भाग, कोमोरिनचा व नैऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात व मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रवेश केला आहे. मॉन्सून गोव्याच्या नजीक आला असून सध्या तो कन्याकुमारी, कोईमतूर, हसन, कारवारपर्यंत पोहचला आहे. येत्या २ ते ३ दिवसात मध्य अरबी समुद्र, कनार्टक, तामिळनाडु, पाँडेचरी, कराईकल तसेच बंगालच्या उपसागरात आणखी काही भाग आगमनाच्या दृष्टीने अनुकुल स्थिती आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

महाबळेश्वर १८७, पेण १६०, गगनबावडा, पोलादपूर १४५, लांजा १३०, दापोली १२०, चिपळूण १००, राजापूर, हर्णे ९०, गुहागर ८०, जव्हार ७०, भुसावळ, इगतपुरी ११०, माहे १२७, अलिबाग १०८, पणजी २६़५, चंदगड ८०, सुरगणा, दिंडोरी, राधानगरी, यावल ७०, चिंचवड, पन्हाळा, निफाड, नंदुरबार ६०, येवला ५०, नसरापूर आणि जाफराबाद ४८, वैजापूर ३९, औरंगाबाद २३, मुंबई ५०, नागपूर १८, पुणे ४३.१, नाशिक १४४.२, कोल्हापूर १४.७, रत्नागिरी ५२.६, सातारा ५७.१, सांगली ११.७, मालेगाव ६०, जळगाव २२.५, अकोला ६.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.

* ५ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. * ७ व ८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेgoaगोवाKarnatakकर्नाटकMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामानRainपाऊस