शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! मॉन्सून केरळमध्ये दाखल ; भारतीय हवामान विभागाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:08 IST

मॉन्सूनची वाटचाल कशी असेल व देशातील विविध भागात कसा व किती पाऊस होईल,याचा अंदाज आज दुपारी हवामान विभाग जाहीर करणार आहे़.

पुणे : कोरोना विषाणुच्या विरोधात संपूर्ण देश लढत असताना हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाची सुखद खबर दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा सोमवारी भारतीय हवामान विभागाने केली आहे. यापूर्वी यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा ५ जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यामुळे मॉन्सूनचे वारे खेचून आणल्याने केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.

देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले काही दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली होती. मॉन्सूनने बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केल्याने हवामान विभाग सतर्क झाला होता. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मॉन्सूनच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मे रोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखी थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार पुढे वाटचाल केली होती.त्यामुळे हवामान विभागाचा यावेळी अंदाज खरा ठरवत केरळमध्ये मॉन्सून १ जून रोजी दाखल झाला आहे. 

हवामान विभागाने देशातील मागील ३० वर्षाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखांचा अभ्यास करुन विविध ठिकाणी मॉन्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. तरीही केरळमधील मॉन्सूनच्या आगमनाची तारीख १ जून हीच कायम ठेवली आहे.  मॉन्सूनची वाटचाल कशी असेल व देशातील विविध भागात कसा व किती पाऊस होईल,याचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज आज दुपारी हवामान विभाग जाहीर करणार आहे़........

गेल्या ५ वर्षातील केरळला मॉन्सूनच्या आगमनाचा तारखा २०१५-  ५ जून ३० मे२०१६ -८ जून ७ जून२०१७ - ३० मे ३० मे२०१८ - २९ मे २९ मे२०१९ - ८ जून ६ जून

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामानFarmerशेतकरी