पिलावरील उपचारासाठी माकडीण दवाखान्यात! उपचारानंतर ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 11:31 IST2022-06-09T09:14:56+5:302022-06-09T11:31:15+5:30
डॉ. एस. एम. अहमद यांच्या खासगी क्लिनिकमध्ये ही आगळीवेगळी घटना घडली. कोठून तरी पडल्यामुळे माकडीण व तिच्या पिलाला जखमा झाल्या असाव्यात, असा अंदाज आहे.

पिलावरील उपचारासाठी माकडीण दवाखान्यात! उपचारानंतर ठोकली धूम
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारच्या रोहतास जिल्ह्यापचार होईपर्यंत ती त्याला छातीशी कवटाळून बसली होती. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.तील क्लिनिकमध्ये आगळावेगळा प्रकार घडला असून, एक माकडीण जखमी पिलाला उपचारासाठी घेऊन आली होती.
डॉ. एस. एम. अहमद यांच्या खासगी क्लिनिकमध्ये ही आगळीवेगळी घटना घडली. कोठून तरी पडल्यामुळे माकडीण व तिच्या पिलाला जखमा झाल्या असाव्यात, असा अंदाज आहे. जखमी अवस्थेत ती क्लिनिकसमोर पिल्लाला घेऊन बसली होती. डॉक्टरांनी माकडिणीला खाणाखुणांनी आत बोलावले. काही वेळाने ती आत गेली व डॉक्टरांच्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या स्टुलावर बसली. डॉक्टरांनी तिला व पिलाला मलमपट्टी केली. उपचार होताच काही वेळाने तिने धूम ठोकली. नंतर गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु ती कोठेही आढळली नाही. हा प्रकार पाहण्यासाठी क्लिनिकबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोकांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढला व व्हायरल केला.