शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:37 IST

Jara Hatke News: कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा धार्मिकस्थळी आपल्याला  माकडांची वर्दळ अनेकदा दिसून येते.  बऱ्याचदा ही माकडं आपल्या मर्कटलीला दाखवून लोकांना हैराण करतात. तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोडाई कॅनॉल येथील अशीच एक घटना घडली आहे.

कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा धार्मिकस्थळी आपल्याला  माकडांची वर्दळ अनेकदा दिसून येते.  बऱ्याचदा ही माकडं आपल्या मर्कटलीला दाखवून लोकांना हैराण करतात. तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोडाई कॅनॉल येथील अशीच एक घटना घडली आहे. येथे एका माकडाने झाडाच्या फांदीवर बसून खाली ५००-५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला. ही घटना कोडाई कॅनॉल येथील गुना केव्ह्स येथे घडल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. तसेच मंजुम्मल बॉईज या चित्रपटानंतर हे ठिकाण अधिकच प्रसिद्ध झालं आहे.  

या बाबत समोर आलेल्या माहितीनुसार, एका माकडाने कर्नाटकहून आलेल्या काही पर्यटकांच्या बॅगेतून ५०० रुपयांच्या नोटांचं एक बंडल चोरलं. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना वाटलं की आता हे पैसे काही मिळत नाहीत. मात्र या माकडाने आपल्या मर्कटलीला सुरू करत झाडावर उडी मारली. तिथून तो एका उंच फांदीवर पोहोलचा. त्यानंतर या माकडाने पळवलेल्या नोटांच्या बंडलामधून एक एक नोट खाली फेकण्यास सुरुवात केली.  

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने रेकॉर्ड केला. तसेच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या या व्हिडीओमध्ये माकड नोटा फाडण्याचा प्रयत्न करताना आणि त्या खाली फेकताना दिसत आहे.  

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांकडूनही वेगवेगळ्या आणि गमतीदार कमेंट केल्या जात आहेत. आजच्या काळात पैशांना किती महत्त्व आहे हे माकडांनाही कळलंय, असं एका युझरनं लिहिलंय, तर या ५०० रुपयांच्या नोटा खऱ्या आहेत का? असा सवाल काही लोकांनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMonkeyमाकड