मनी पेज : सेबी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
छोट्या समभागांसाठी

मनी पेज : सेबी
छ ट्या समभागांसाठी बनविणार नवीन समूहमुंबई : कमी किमतीच्या समभागांच्या (पेनी स्टॉक्स) माध्यमातून बाजारातील संभाव्य हेराफेरी रोखण्यासाठी अशा समभागांचा स्वतंत्र समूह करण्याच्या सूचना सेबी शेअर बाजारांना देणार आहे.या समूहास टी-प्लस असे नाव दिले जाईल. टी समूहात असूनही हेराफेरी होण्याचा धोका कायम असणार्या समभागांनाच टी-प्लस समूहात टाकले जाईल. या समभागांत डिलिव्हरीवर आधारित छोट्या म्हणजेच पाच टक्क्यांच्या टप्प्यात व्यवहार होऊ शकतो. हे समभाग एकाच दिवसात खरेदी करून विक्री करण्याची परवानगी नसते. एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, नव्या समभागांच्या समूहास आणखी छोट्या दोन टक्क्यांच्या टप्प्यातही ठेवले जाऊ शकते. या काऊंटरांवर योग्य व्यवहारच व्हायला हवेत, यासाठी इतरही काही अंकुश लावले जाऊ शकतात. या समभागांत हेराफेरीची एक विशिष्ट पद्धती आढळून आली आहे. त्यानुसार, ऑपरेटर या श्रेणीतून बाहेर पडण्याआधी या समभागांचे भाव वाढवून देतात. थेट किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाते. शेअर विकल्यानंतर त्यांना सरळ सरळ कचर्याचीच टोपली दाखविली जाते. या कंपन्या अपरिचित असल्यामुळे नंतर त्यांचे समभाग कोणीच खरेदी करीत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार बुडतात.