फिर्यादीकडेच मागितले पैसे !

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:37+5:302015-08-13T22:34:37+5:30

फिर्यादीकडेच मागितले पैसे !

The money demanded by the plaintiff! | फिर्यादीकडेच मागितले पैसे !

फिर्यादीकडेच मागितले पैसे !

र्यादीकडेच मागितले पैसे !
दोघा पोलीस अधिकार्‍यांची बदली
आझाद मैदान ठाण्यातील प्रकार

मुंबई: चोरीबाबत तक्रार दिलेल्या एका व्यापार्‍याला धमकावून त्याच्याकडे पाच लाखांची मागणी करणार्‍या आझाद मैदान पोलीस ठाण्यातील दोघा अधिकार्‍यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात (एल-ए) बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण पाटील आणि उपनिरीक्षक रमाकांत पाटील अशी त्यांची नावे आहेत. दोघांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
इलेक्ट्रिक वस्तंूचा व्यापार करणार्‍या केतन पटेल यांचे मरिन लाईन्सजवळील धोबी तलावाजवळ गोदाम आहे. त्याठिकाणी चोरी होत असल्याची तक्रार त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दिली होती. दुकानातील कर्मचारी चोरी करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल चौरसिया, राम बहाद्दूर यादव, ब्रम्हदेव शहा, शंकर शहा या कामगारांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. निरीक्षक पाटील व उपनिरीक्षक रमाकांत पाटील यांनी आरोपींकडे चौकशी करण्याऐवजी ते पटेल यांनाच दमदाटी करु लागले. कामगारांनी मारहाण केल्याची तक्रार दिली असून तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो, असे धमकावत ५ लाखांची मागणी त्यांनी केली. पटेल यांनी त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्याकडून पोलीस आयुक्ताकडे हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी दोघांची बदली करुन विभागीय चौकशीचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The money demanded by the plaintiff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.