शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 8:24 PM

तरुणीने या व्यक्तीच्या कानशिलात लगावूनही शेजारील प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे. 

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये निर्भया बलात्काराचे एवढे मोठे प्रकरण घडूनही देशात महिला सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुग्राममधील हुडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने 29 वर्षीय तरुणीसमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीने या व्यक्तीच्या कानशिलात लगावूनही शेजारील प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे. 

तरुणीने सांगितले की, हा व्यक्ती तिच्याकडे पाहत अश्लील कृत्य करत होता. यावेळी त्याच्या कानाखाली लगावले, तेव्हा त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आरडा-ओरडा केला. पण तेथील प्रवासी पाहून पुढे जात होते. कोणीही मदतीसाठी आले नसल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. यानंतर ही तरुणी घाबरून घरी आली. हे प्रकरण 14 जूनच्या रात्रीचे आहे. 

या पीडित तरुणीने हा घटनाक्रम सोशल मिडीयावर सांगितल्याने हा प्रकार उघड झाला. यानंतर गुरुग्राम पोलिसांनी या व्यक्तीचा तपास केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे. मात्र, तरुणीने पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. ही तरुणी दिल्लीची रहिवासी असून गुरुग्राम शहरातील एक कंपनीमध्ये व्यवस्थापक आहे. या प्रकरणी ती गुन्हा दाखल करणार आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळूनही सोमवारी दुपारपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. 

हुडा सिटी मेट्रो स्थानकावर यलो लाईनवरून उतरल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्गाने जात होती. एस्कलेटरवर आल्यानंतर तिला कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भास झाला. 14 जूनच्या रात्री 9.25 मिनिटांनी हा प्रकार घडला. प्रवाशांची संख्याही जास्त होती. हा व्यक्ती तिच्याकडे सारखा पाहत होता. त्याच्याकडे सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळीतच त्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याला रोखण्यासाठी तरुणीने कानाखाली मारली. यावेळी तिथे महिलाही होत्या. मात्र, कोणीही पुढे आले नाही, असे या तरुणीने सांगितले. 

टॅग्स :Metroमेट्रोdelhiदिल्ली