मोले अभिनवचे स्नेहसंमेलन

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:07+5:302014-12-23T00:04:07+5:30

ओळी :मोले अभिनव विद्यामंदीर व शाळा समुहच्या स्नेहसंमेलनात बोलताना सावर्डेचे आमदार गणेश गांवकर बाजूस सरपंच गोविंद गांवकर, मुध्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर, रिमा नाईक व इतर. (चाया : एकनाथ खेडेकर)

Mole Abhinav's affectionate | मोले अभिनवचे स्नेहसंमेलन

मोले अभिनवचे स्नेहसंमेलन

ी :मोले अभिनव विद्यामंदीर व शाळा समुहच्या स्नेहसंमेलनात बोलताना सावर्डेचे आमदार गणेश गांवकर बाजूस सरपंच गोविंद गांवकर, मुध्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर, रिमा नाईक व इतर. (चाया : एकनाथ खेडेकर)
शिगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपले कौशल्या दाखवून पारितोषिके मिळवून आपल्या आईवडीलांचे नाव उज्ज्वल केले पाहिजे. असे प्रतिपादन सावर्डेचे आमदार गणेश गांवकर यांनी मोले अभिनव विद्यामंदीर व शाळा समुहच्या स्नेहसमंलनात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य रिमा नाईक, मोलेचे सरपंच गोविंद गावकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्याम प्रभू, हायस्कूलचे मुध्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर, शाळा समुह समितीच्या सचिव वेळीप उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार गांवकर म्हणाले कि, अभिनव विद्यामंदीर विद्यालयाचे शिक्षक तसेच पालक कौतुकास्पद पात्र आहेत. सावर्डे मतदारसंघात म्हणून ६२ शाळा आहेत. भाऊसाहेब बांदोडकर यानी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गावागावात शाळा बांधून शिक्षणाचे बिज पेरले. साळो शाळेचे नुतनीकरण चाळीस वर्षांनंतर पुर्ण झाले आहेत. या मतदार संघाच्य ानागरिकांना शिक्षणासाठी सदैव पाठींबा राहिल. सरकारद्वारे जे काही शाळेला पाहिजे ते मिळवून देण्याचा आपला सदैव प्रयत्न राहील.
धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य रिमा नाईक म्हणाले कि, विद्यालयाचे विद्याथी जेव्हा रंगमंचावर येऊन प्रमुख पाहुण्याहस्ते बक्षीस घेतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणीत होत असतो. प्रत्येक आई-वडीलांना आपली मुले यशस्वी झाली पाहिजे असे नेहमीच वाटत असते.
मोलेचे सरपंच गोविंद गांवकर यानी अभिनव विद्यामंदीरात आपले शिक्षण झाले असून या विद्यालयाचा आपणास अभिमान आहे. या विद्यालयाच्या शिक्षकांनी सदोदित आपणास सहकार्य केल्याने आज मी सरपंच या नात्याने आपल्या समोर उभे राहू शकलो असे सांगून या विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले.
शाळा समुहीचा वार्षिक अहवाल शिक्षिका वेळी यांनी वाचून दाखविला. सुत्रसंचालन शिक्षक पि.के. नाईक यांनी केले.
या विद्यार्थ्यांतर्फे तसेच शाळा समुहातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस देण्यात आली. तद्नंतर सांस्कृती आगळा-वेगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.

Web Title: Mole Abhinav's affectionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.