शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मोईन, रायुडू यांची तुफानी फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:15 AM

अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाजीचा हा निर्णय चेन्नईने चुकीचा ठरविला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने युवा ॠतुराज गायकवाडला बाद केले

ठळक मुद्देअरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाजीचा हा निर्णय चेन्नईने चुकीचा ठरविला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने युवा ॠतुराज गायकवाडला बाद केले

अयाज मेमन

नवी दिल्ली : पहिल्याच षटकात बसलेल्या धक्क्यानंतर फाफ डुप्लेसिस आणि मोइन अली मुंबई इंडियन्सवर अक्षरश: बरसले. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०८ धावांची भागीदारी करून चेन्नई सुपरकिंग्सच्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाया रचला. किएरॉन पोलार्डने एकाच षटकात दोन बळी घेत, मुंबईला पुनरागमन करून दिले, परंतु अंबाती रायुडूने २७ चेंडूंत नाबाद ७२ धावांचा जबर तडाखा देत, चेन्नईला २० षटकांत ४ बाद २१८ धावांची मजबूत मजल मारून दिली.

अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाजीचा हा निर्णय चेन्नईने चुकीचा ठरविला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने युवा ॠतुराज गायकवाडला बाद केले. मात्र, यानंतर अली मुंबईकरांवर तुटून पडला. त्याने बोल्टसह सर्वच गोलंदाजांवर तुफानी हल्ला करताना चेन्नईच्या धावगतीला कमालीचा वेग दिला.

अलीची फटकेबाजी पाहून डुप्लेसिसही चार्ज झाला आणि त्यानेही मुंबईकरांविरुद्ध आक्रमक फटके मारले. यामुळे दोन्ही टोकांकडून मुंबईकरांची बेदम पिटाई झाली. चेन्नईने बघता-बघता १० हून अधिकच्या सरासरीने धावा काढल्या. यामध्ये आघाडीवर राहिला तो मोइन अली. त्याने ३६ चेंडूंत ५चौकार व ५ षटकारांसह ५८ धावा कुटल्या. फाफ डुप्लेसिसनेही २८ चेंडूंत ५० धावा केल्या.  हे दोघे खेळपट्टीवर असेपर्यंत मुंबईकर गोलंदाजांची लय बिघडलेली होती. मात्र, हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहने अलीला बाद करून मुंबईसाठी मोलाचे कार्य केले. यानंतर, पोलार्डने आपल्या पहिल्याच षटकात डुप्लेसिस व सुरेश रैना यांना बाद करून मुंबईला पुनरागमन करून दिले. यामुळे चेन्नईचा डाव १ बाद ११२ धावांवरून ४ बाद ११६ धाव असा घसरला. 

दोन स्थिरावलेले फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने चेन्नईच्या धावगतीलाही ब्रेक लागला. यावेळी मुंबई पकड मिळवणार असे दिसत असताना, अंबाती रायुडू तळपला. त्याने ४ चौकारांसह ७ षटकारांचा पाऊस पाडत मुंबईकरांची धुलाई केली. अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावत रायुडूने महेंद्रसिंग धोनीच्या वेगवान अर्धशतकाशी बरोबरी केली. त्याने जडेजासह पाचव्या गड्यासाठी १०२ धावांची नाबाद भागीदारी केली.

महत्त्वाचेnॠतुराज गायकवाड यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा डावखुऱ्या गोलंदाजाचा शिकार ठरला. या आधी तो अर्शदीप सिंग आणि मुस्तफिझूर रहमान यांच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. nरोहित शर्मा ३५० टी-२० सामना खेळणारा पहिला भारतीय ठरला. nसुरेश रैनाने २००वा आयपीएल सामना खेळला. nयंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेकडून चार शतकी भागीदारी झाल्या. nआयपीएलमध्ये दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराहने ५०हून अधिक धावा दिल्या. nअंबाती रायुडू सीएसकेकडून तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक झळकावले. nसीएसकेकडून सलग चार अर्धशतक झळकावणारा फाफ डुप्लेसिस पहिला फलंदाज ठरला.

षटकारांचा पाऊसचेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजांनी यावेळी तुफानी हल्ला करताना मुंबईकरांची लय बिघडविली. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी मानले जात असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सीएसकेच्या फलंदाजांनी कोणतीही दयामाया दाखविली नाही. मोईन अलीने ५, फाफ डुप्लेसिसने ४, तर अंबाती रायुडूने ७ षटकार ठोकत सीएसकेच्या धावगतीला वेग दिले. मुंबईविरुद्ध यावेळी एकूण १६ षटकार बसले.

 

टॅग्स :IPLआयपीएल २०२१Chennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्सambati rayuduअंबाती रायुडू