मोक्कांतर्गत मोहोळच्या पोलिस कोठडीत वाढ
By admin | Updated: June 5, 2015 00:05 IST
पुणे : न्यायालयायाच्या आवारात जीवे ठार मारण्याची धमकी देत ३ लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी मोक्काअंतर्गत विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनीा शरद हिरामण मोहोळसह तिघांच्या पोलीस कोठडीत ९ जूनपयंर्त वाढ करण्याचा आदेश दिला आहे.
मोक्कांतर्गत मोहोळच्या पोलिस कोठडीत वाढ
पुणे : न्यायालयायाच्या आवारात जीवे ठार मारण्याची धमकी देत ३ लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी मोक्काअंतर्गत विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनीा शरद हिरामण मोहोळसह तिघांच्या पोलीस कोठडीत ९ जूनपयंर्त वाढ करण्याचा आदेश दिला आहे. शरद हिरामण मोहोळ (वय ३१), सुशिल गणेश मंडल (वय २३, रा. ८२४, भवानी भेठ), सचिन ऊर्फ गोट्या तानाजी शिळीमकर (वय ४०, रा. लोहियानगर) या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मोहोळ याच्याविरोधात कोथरूड, डेक्कन, दत्तवाडी, वानवाडी, येरवडा, खडकी या पोलीस ठाण्यात खूनाचे तीन, खूनाच्या प्रयत्नाचे दोन, खंडणीचे ३ आणि शस्र बाळगल्याचे २ गुन्हे दाखल केले आहेत. भालेराव याच्याविरोधात वारजे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मंडल याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात खूनाचा अणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला. भालेराव आणि मंडल यांनी शरद मोहोळने भेटायला बोलाविले असल्याचा निरोप गुरूवार पेठ येथील धोबी व्यावसायिक योगेश सहदेव पारडे (वय 32) यांना दिला. त्यानुसार पारडे मोहोळला न्यायालयात भेटला. त्यावेळी मोहोळ याने माझी २ मुले तुला भेटायला येतील, त्यांना ३ लाख रुपये खंडणी दे. अशी धमकी पारडे यांना दिली. याबाबतची तक्रार पारडे यांनी खडक पोलिसात दिली. त्यावेळी मोहोळ टोळीच्या गुन्हेगरीला चाप लावण्यासाठी खडक पोलिसांनी मोहोळसह तिघांवर मोक्का लावला होता. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी या गुन्ातील अक्षय शिवाजी भालेराव हा फरार असून, त्याच्या शोधासाठी. तिघांनी कोठे स्थावर आणि जंगम मालमत्ता घेतली आहे का, त्यांचे अन्य कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस.एम.जगताप यांनी केली. ही मागणी ग्रा धरत न्यायालयाने वरील आदेश दिला आहे.