शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:55 AM

गेल्या 75 वर्षात आपण योग्य दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही.

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सतत धर्म आणि देवाचे नाव घेणाऱ्यांना सुनावलं आहे. संत ईश्वर सन्मान समारोह 2021 मध्ये बोलत असताना भागवत म्हणाले की, 'आपण जय श्री रामच्या घोषणा देतो, पण आपण त्यांच्यासारखे बनले पाहिजे. रामाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.'

भागवतांचा मोठा सल्ला

दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात संघप्रमुख भागवत म्हणाले की, 'आम्ही जय श्री रामचा नारा खूप जोरात लावतो. पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतात, आपण करू शकत नाही, असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यामुळेच अनेकजण रामाच्या मार्गावर जात नाहीत. रामाप्रमाणे स्वतःचा स्वार्थ सोडून लोकांचे भले करणे अवघड काम आहे.

भागवत पुढे म्हणतात, मनापासून काम केले तर देशाची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी सर्वांना आपला भाऊ मानला पाहिजे. सेवा आणि लोककल्याणाची कामे केवळ घोषणा देऊन होत नाहीत, तर त्यासाठी पूर्ण जाणीवेने जमिनीवर उभे राहून काम करावे लागते. गेल्या 75 वर्षात आपण त्या दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. पण,जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवून काम केले तर आपण हे ध्येय गाठू शकतो. RSS संघटना ही सेवा संबंधित कार्यक्रमांसाठीही ओळखली जाते, असे ते म्हणाले. तसेच, संघाचे स्वयंसेवक आणि संपूर्ण देशातील येणाऱ्या पिढ्याही मूल्यांनी परिपूर्ण व्हाव्यात, यासाठी भारतीय कुटुंबातील आचार-विचार प्राधान्याने लक्षात घेऊन काम करण्याचा सल्ला मोहन भागवत यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत