माझ्या अडीच वर्षाच्या मुलीची चिंता, मुलाखतीदरम्यान मोहम्मद शामी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 21:47 IST2018-03-10T21:47:52+5:302018-03-10T21:47:52+5:30

अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना शामी भावूक झाला.

mohammad shami became emotional during an interview | माझ्या अडीच वर्षाच्या मुलीची चिंता, मुलाखतीदरम्यान मोहम्मद शामी भावूक

माझ्या अडीच वर्षाच्या मुलीची चिंता, मुलाखतीदरम्यान मोहम्मद शामी भावूक

मुंबई- क्रिकेटर मोहम्मद शामी विरोधात त्याची पत्नी हसीन जहांने मोर्चा उघडला आहे. पत्नीच्या या सर्व आरोपांवर मोहम्मद शामीने उत्तरं दिली आहेत. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शामीने पत्नीच्या आरोपांवर स्षष्टीकरण दिलं. इतकंच नाही, तर एका प्रश्नाचं उत्तर देताना शामी भावूकही झाला. त्याच्या अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना शामी भावूक झाला. सर्व वादानंतरही सर्व काही ठीक होईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. 

मी जेव्हाही पत्नीने केल्या आरोपांबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. मला तिला सुरक्षित ठेवायचं आहे. तिच्या भविष्याची खूप चिंता आहे. ती फक्त अडीच वर्षांची आहे. तिच्यासाठी सगळं काही सुरळीत करण्याची माझी इच्छा आहे, हे बोलताना मोहम्मद शामीच्या डोळ्यात अश्रृ आले. 

'वाद एवढा वाढलाय, नात्यातलं अंतर एवढं वाढलंय, की काहीजण या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. हे आमचं खाजगी प्रकरण आहे. जो काही गैरसमज असेल, तो संवादाने सुटला पाहिजे. जी घरातली गोष्ट हसीनने बाहेर आणली आहे, त्याने लोकांमध्ये हसं झालं आहे. असं शमी म्हणाला.

माझ्या व पत्नीमधील वाद बाहेर न जाता घरातच सोडविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. माझी मुलगी, पत्नी आणि कुटुंबांची अब्रू घरातच रहावी. मुलीच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा वाद घरातच रहावा, अशी इच्छा आहे,असं मत शामीने व्यक्त केलं. 
हसीन जहां शामीवर करत असलेल्या आरोप प्रकरणात इतर कुणाचा तरी हात असल्याची शंकाही शामीने व्यक्त केली आहे. 'घरातला वाद तेव्हाच बाहेर निघतो, जेव्हा त्याच्या मागे कुणाचा हात असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असेल, शेवटच्या दिवसापर्यंत करत असेल, मात्र अचानक दोनच दिवसात एवढा मोठा बदल होतो. हे तिचं काम असू शकत नाही, तिचं कुणीतरी ब्रेनवॉश केलं असावं, असंही शामीने म्हंटलं.
 

Web Title: mohammad shami became emotional during an interview