सीएएच्या समर्थनार्थ मोदींची सोशल मीडियावर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:11 IST2019-12-31T02:11:42+5:302019-12-31T02:11:57+5:30

मोदींकडून आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ पोस्ट

Modi's social media campaign in support of CAA | सीएएच्या समर्थनार्थ मोदींची सोशल मीडियावर मोहीम

सीएएच्या समर्थनार्थ मोदींची सोशल मीडियावर मोहीम

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मोदी यांनी आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मोदी यांनी टष्ट्वीट केले आहे की, सीएएशी संबंधित पैलूंची स्पष्ट व्याख्या आणि आणखी काही बाबींवर सद्गुरूंचे मत ऐका. त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा हवाला दिला आहे आणि आमच्या बंधुत्वाच्या संस्कृतीचा शानदार उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी स्वार्थासाठी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांचाही पर्दाफाश केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी टष्ट्वीटर हँडलवरून असेही म्हटले आहे की, छळ झालेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. यात कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याचे म्हटलेले नाही.

Web Title: Modi's social media campaign in support of CAA