शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

मोदी पुतीन यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:27 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ मे रोजी रशियाच्या सोची शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ मे रोजी रशियाच्या सोची शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. ही चर्चा अनौपचारिक असणार आहे आणि या वेळी मोदी यांच्यासाठी ‘गार्ड आॅफ आॅनर’असणार नाही. तसेच, कोणत्याही दस्तऐवजावर हस्ताक्षर होणार नाहीत. या चर्चेचा कोणताही अजेंडा असणार नाही. दोन्ही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विषयांपासून देशांतर्गत राजकारणावर चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच चीनमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशाी अनौपचारिक चर्चा केली होती. त्याचप्रमाणे ही दुसरी अनौपचारिक चर्चा आहे. असे समजले जात आहे की, मोदी यांच्या विदेशनीतीचा हा नवा अध्याय आहे. या माध्यमातून ते जगातील नेत्यांसोबत राजकीय नात्याला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.सूत्रांनी सांगितले की, ही चर्चा अनौपचारिक असली तरी, या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही देशात उर्जा क्षेत्रात संयुक्त उपक्रम उभारण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रशियासोबत उर्जा क्षेत्रात एकत्र काम करु इच्छितो. आम्ही संयुक्त कंपनी बनविण्याबाबतही काम करु इच्छितो. केवळ भारत, रशियात नव्हे, तर अन्य देशात मिळून काम करणे शक्य होईल. याशिवाय अणुउर्जा क्षेत्रात रशियासोबत भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अध्यक्ष पुतीन यांना भेटतील तेव्हा या विषयावर चर्चा होईल.या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बहुप्रतीक्षित गॅस पाइपलाइनवर चर्चा होऊ शकते काय? असा प्रश्न केला असता या अधिकाºयाने सांगितले की, हा मुद्दा दोन्ही देशात औपचारिक स्वरुपात होणाºया बैठकीत येईल. ही बैठक यावर्षी दुसºया सहामाहीत होऊ शकते.>अनेक मुद्दयांवर चर्चाया मुलाखतीतील अन्य महत्वाच्या मुद्यांवर एका अधिकाºयाने सांगितले की, अमेरिकेने इराणवर प्रतिबंध लावण्यासोबतच रशियावरही प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे. अशावेळी भारतासाठी दुहेरी समस्या होऊ शकते. इराणकडून कच्चे तेल खरेदीची समस्या होऊ शकते.तथापि, भारत आपल्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करतो. अशावेळीअमेरिकी प्रतिबंधामुळे डॉलरमध्ये याची खरेदी शक्य होणार नाही. असे सांगितले जात आहे की, या दोन्ही मुद्यांवरही पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते. रशियाला इराणचा समर्थक मानले जाते.