नवी दिल्ली: दिल्लीच्या रामलीला मैदानातून काँग्रेसकडून ‘मत चोरी’च्या मुद्द्यावर महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र, रॅली सुरू होण्यापूर्वीच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन "मोदी तेरी कब्र खुदेगी" अशाप्रकारची घोषणाबाजी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
...म्हणून जनतेने काँग्रेसला नाकारले
संबित पात्रा म्हणाले, काँग्रेस विसरते आहे की, जेव्हा-जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईंबद्दल अपमानास्पद वक्तव्ये झाली आहेत, तेव्हा-तेव्हा जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. ही काँग्रेसची केवळ अहंकाराची भाषा आहे.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी याचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे:-
संसदेत चर्चा झाली, तरी रॅली का?
काँग्रेस ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर रॅली काढत आहे, पण संसदेत यावर आधीच चर्चा झाली आहे. याच काँग्रेसने SIR विषयावर सभागृहात चर्चेसाठी नोटीस दिली होती. राहुल गांधींनी जेव्हा या चर्चेत भाषण केले, तेव्हा त्यांची तोकडी माहिती आणि राजकारण सभागृहात स्पष्ट दिसून आले. बिहारमधील कोणत्याही मतदारसंघात गडबड झाली असे वाटत असेल, तर थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करा. पण काँग्रेस एकही तक्रार करणार नाही; फक्त बदनामी करण्याचा प्रयत्न करेल.
टी-शर्टवाले राहुल त्या दिवशी खादीत
राहुल गांधींचा उल्लेख करताना पात्रा म्हणाले, नेहमी टी-शर्ट घालणारे राहुल गांधी त्या दिवशी खादी घालून सभागृहात आले होते. पण पंतप्रधानांबाबत ‘कब्र’सारख्या घोषणा दिल्या जात असतील, तर काँग्रेसने इतिहास लक्षात ठेवावा. गृहमंत्र्यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांना मुद्देसूद उत्तर दिले आहे. गृहमंत्र्यांनी मतांची चोरी कधी झाली हे देखील स्पष्ट केले आहे. नेहरूंच्या पंतप्रधान होण्यापासून ते रायबरेलीच्या निवडणुकीपर्यंत आणि आता सोनिया गांधींच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
घुसखोरांचा मुद्दा नको म्हणून वॉकआऊट
गृहमंत्र्यांनी घुसखोरीचा उल्लेख करताच काँग्रेसने त्याला विरोध करत सभागृहातून वॉकआऊट केल्याचा आरोपही पात्रा यांनी केला. आजची रॅली ही घुसखोरांना वाचवण्यासाठीच काढली जात आहे. काँग्रेस किती काळ तुष्टीकरणाचे राजकारण करणार? असा सवालही पात्रांनी यावेळि विचारला.
Web Summary : Congress rally chants "Modi Teri Kabra Khudegi," sparking BJP's criticism. Sambit Patra condemns the disrespectful slogans, recalling past rejections by the public due to similar remarks. BJP alleges Congress avoids addressing actual issues.
Web Summary : कांग्रेस रैली में 'मोदी तेरी कब्र खुदेगी' के नारे लगे, जिससे बीजेपी ने कड़ी प्रतिक्रिया दी। संबित पात्रा ने अपमानजनक नारों की निंदा की और कहा कि जनता ने पहले भी ऐसी टिप्पणियों को नकारा है। बीजेपी का आरोप है कि कांग्रेस वास्तविक मुद्दों से बचती है।