शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आली होती मोदी लाट; विरोधक झाले होते भुईसपाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 11:56 IST

बरोब्बर पाच वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खास ठरला होता.

नवी दिल्ली - आज 16 मे. बरोब्बर पाच वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खास ठरला होता. 16 मे 2014 रोजी सोळाव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. या निकालांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने विरोधकांचे आव्हान उद्ध्वस्त करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली होती. विशेष बाब म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच देशामध्ये स्पष्ट बहुमतासह सरकार बनले होते.1984 नंतर प्रथमच देशात कुठल्याही एका पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन झाले होते. तसेच 1980 मध्ये स्थापना झालेल्या भारतीय जनता पक्षालाही प्रथमच केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारविरोधात असलेल्या वातावरणामुळे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र भाजापला स्वबळावर बहुमत मिळेल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र या विजयानंतर भाजपाने आक्रमक पवित्र्यासह देशात पक्षविस्ताराला सुरुवात केली होती. 

सोळाव्या लोकसभेसाठी  7 एप्रिल 2014 ते 12 मे 2014 या दरम्यान नऊ टप्प्यात मतदान झाले होते. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेत सुमारे 66.38 टक्के लोकांनी मताधिकाराचा वापर केला होता. मतमोजणीमध्ये भाजपाला 282 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर काँग्रेसची 44 जागांवर घसरगुंडी उडाली होती. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 59 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसनंतर 37 जागा जिंकून अण्णा द्रमुक हा तिसरा पक्ष बनला होता. तर तृणमूल काँग्रेसला 34, बीजू जनता दलला 20, शिवसेनेला 18, तेलुगू देसम पक्षाला 16, तेलंगणा राष्ट्र समितीला 11 जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 6, समाजवादी पक्षाला पाच तर आपला चार जागा मिळाल्या होत्या. 
या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला 31.1 टक्के, काँग्रेसला 19.3 टक्के मते मिळाली होती. बसपाला 4.1 टक्के, तृणमूल काँग्रेसला 3.8 टक्के, समाजवादी पक्षाला 3.4 टक्के, अण्णा द्रमुकला 3.3 टक्के, सीपीआय एम ला 3.3 टक्के तर इतक पक्षांना 31.8 टक्के मते मिळाली होती. सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्रासपणे झालेला वापर. नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या झंझावाती सभा हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले होते. तर विविधा घोटाळ्यांच्या जंजाळात अडकलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, आता 17 व्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, 23 मे रोजी लागणाऱ्या निकालामध्ये नरेंद्र मोदी 2014 प्रमाणेच चमत्कार दाखवणार की काँग्रेस भाजपाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सElectionनिवडणूकcongressकाँग्रेस