मोदींकडून वाजपेयी, नवाज शरीफ यांना 'हॅप्पी बर्थडे'

By Admin | Updated: December 25, 2016 10:55 IST2016-12-25T10:04:45+5:302016-12-25T10:55:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Modi, Vajpayee, Nawaz Sharif, Happy Birthday | मोदींकडून वाजपेयी, नवाज शरीफ यांना 'हॅप्पी बर्थडे'

मोदींकडून वाजपेयी, नवाज शरीफ यांना 'हॅप्पी बर्थडे'

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करून मोदींनी दोघांनाही सुखी, समाधानी आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
 

25 डिसेंबर 1924 मध्ये जन्मलेल्या वाजपेयींनी आज वयाच्या 92 व्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्त मोदींनी स्वतःचा वाजपेयींची भेट घेत असतानाचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

(पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती)

 
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही मोदींनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शरीफ हे आज 67 वा जन्मदिन साजरा करत आहेत. गेल्या वर्षी शरीफ यांच्या वाढदिवशी अफगाणिस्तानहून परतताना मोदी पाकिस्तानात थांबले होते. जवळपास 80 मिनीट दोघांची भेट झाली होती. मात्र, या भेटीच्या काही दिवसांनंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत गेला.   
 

Web Title: Modi, Vajpayee, Nawaz Sharif, Happy Birthday