'मोदी हे राम, शहा हे लक्ष्मण योगी आदित्यनाथ हे हनुमान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:58 IST2018-05-13T00:58:43+5:302018-05-13T00:58:43+5:30

बलात्कारांची प्रकरणे वाढण्यास पालक व मोबाइल जबाबदार आहेत, असे म्हणून वाद निर्माण करणारे भाजपाचे बैरियाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंग

'Modi is Ram, Shah Laxman Yogi Adityanath Hanuman' | 'मोदी हे राम, शहा हे लक्ष्मण योगी आदित्यनाथ हे हनुमान'

'मोदी हे राम, शहा हे लक्ष्मण योगी आदित्यनाथ हे हनुमान'

बलिया (उत्तर प्रदेश) : बलात्कारांची प्रकरणे वाढण्यास पालक व मोबाइल जबाबदार आहेत, असे म्हणून वाद निर्माण करणारे भाजपाचे बैरियाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंग यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्राचे अवतार आहेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची तुलना लक्ष्मणाशी केली आहे. रामराज्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या कार्यात योगदान देण्यासाठी देवानेच शहा यांना लक्ष्मणाच्या रूपाने स्वर्गातून पृथ्वीवर धाडले आहे, असेही ते म्हणाले. भारतात रामराज्य आणू पाहणारे नरेंद्र मोदी हे भगवान रामाचेच अवतार असल्याचे त्यांनी ऐकवले.
पक्षाध्यक्ष अमित शहा हे बुद्धिमत्तेच्या बाबतीत सम्राट चंद्रगुप्ताचे सल्लागार चाणक्याप्रमाणे आहेत, असे सांगूनच ॉसुरेंद्र सिंग थांबले नाहीत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमानाशी केली. हा सारा योगायोग आहे, असे सांगून हे तिघे मिळून भारतात राम राज्य स्थापन करतील आणि लोकांचे रामराज्याचे स्वप्न त्यामुळे पूर्ण होईल, असाही दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

याच सुरेंद्र सिंग यांनी उन्नावमधील तरुणीवर बलात्कार करणारे स्वपक्षाचे आमदार कुलदीप सेंगर यांचे उघडपणे समर्थन केले होते. तसे करताना तीन मुलांची आई असलेल्या महिलेवर कोणी बलात्कार कसे करेल, असे उद्गारही त्यांनी काढले होते. बलात्कार झालेली तरुणी ही तीन मुलांची आई असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच त्यांनी केला होता.

Web Title: 'Modi is Ram, Shah Laxman Yogi Adityanath Hanuman'