'MODI' नावात एक मंत्र आहे त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते; शिवराज चौहानांनी सांगितला फुलफॉर्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:36 PM2020-05-30T12:36:47+5:302020-05-30T12:39:54+5:30

दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला पत्र लिहिलं आहे, यात म्हटलं आहे की, देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती

MODI is not only name its Mantra from which we get energy; Shivraj Chauhan said Fulform! pnm | 'MODI' नावात एक मंत्र आहे त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते; शिवराज चौहानांनी सांगितला फुलफॉर्म!

'MODI' नावात एक मंत्र आहे त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते; शिवराज चौहानांनी सांगितला फुलफॉर्म!

googlenewsNext

भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्या कार्यकाळातील १ वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भाजपा नेत्यांकडून सरकारने केलेल्या कामांचा आढावा देण्यात येत आहे. अलीकडेच मध्यप्रदेशात काँग्रेसचं सरकार पाडून मुख्यमंत्री झालेले शिवराज चौहान यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना मोदी फक्त नाव नाही तर त्यात एक मंत्र आहे अशा शब्दात भाष्य केले आहे.

मोदी नावातील पहिलं अक्षर M – मोटिवेशनल, मेहनती, दुसरं अक्षर O – ओजस्वी आणि ऑर्पाच्युनिटी, तिसरं अक्षर D – दूरद्वेष्टा नेता, डायनॅमिक लीडरशीप, चौथा अक्षर  I – इन्स्पायर, इच्छाशक्ती, इंडिया, नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतात, मोदी फक्त नाव नाही नव्हे तर एका मंत्राच्या रुपाने आम्हाला ऊर्जा देतात असं ते म्हणाले.

तसेच गेल्या एका वर्षात मोदी सरकारने भारत स्वावलंबी होण्यासाठी अनुच्छेद ३७०, सीएए, राम मंदिर बांधकाम, तिहेरी तलाक कायदा, २० लाख कोटीचे पॅकेज अशा अनेक गोष्टी केल्या. असा नेता मिळाला म्हणून आम्ही धन्य आहोत असंही मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले आहे.

दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला पत्र लिहिलं आहे, यात म्हटलं आहे की, देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात तुमची खूप मोठी भूमिका होती. म्हणूनच हा दिवस म्हणजेतुम्हाला वंदन करण्याची,भारत आणि भारतीय लोकशाही प्रति तुमच्या या निष्ठेला प्रणाम करण्याची माझ्यासाठी संधी आहे असं ते म्हणाले.

त्याचसोबत २०१४ मध्ये देशातील जनतेने देशात एक मोठे परिवर्तन आणण्यासाठी मतदान केले होते. २०१९ मध्ये तुमचा आशीर्वाद देशाच्या भव्य स्वप्नांसाठी होता. मागील एका वर्षात देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले, आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली असं त्यांनी सांगितले. कोरोना महामारीने भारतालाही विळखा घातला. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे असंही मोदींनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भीकेला लागलेल्या पाकचे भारताविरुद्ध षडयंत्र सुरुच; झाकीर नाईकच्या मदतीसाठी घेतोय पुढाकार

“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”

शिवसेना नेत्याच्या हत्येमागे धक्कादायक खुलासा; भाजपा नेत्यासह ४ आरोपींना केली अटक

तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा

वुहानमधील ‘या’ कारचा फोटो का होतोय व्हायरल?; सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर

Web Title: MODI is not only name its Mantra from which we get energy; Shivraj Chauhan said Fulform! pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.