शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बांगलादेशनं भारताला प्रगतीच्याबाबतीत खरंच मागे टाकलं आहे का? केंद्रानं संसदेत दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:52 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला बांगलादेशच्या होणाऱ्या प्रगतीवरुन सातत्यानं प्रश्न विचारले जात आहे. बांगलादेशच्या दरडोई उत्पनावरुन विरोधी पक्षानं केंद्र सरकारला धारेवर धरलं. त्यावर केंद्र सरकारनंही प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या वर्षी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) दरडोई उत्पन्नामध्ये बांगलादेश भारतालाही मागे टाकण्याची शक्यता आहे, असा अहवाल प्रकाशित केला होता. याच मुद्द्यावरुन संसदेत रणकंदन सुरू आहे. (Modi govt tells if Bangladesh is set to surpass India’s per capita income in 2021)

केंद्र सरकारनं दिलं उत्तरआयएमएफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरंच बांगलादेश २०२१ मध्ये दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकणार आहे का? असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बाजू मांडली. आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकच्या (WEO) अहवालानुसार भारतात दरडोई सकल राष्ट्रीय उप्तन्नाचा (GDP) अंदाज व्यक्त करायचा झाल्यास एप्रिल २०२१ मध्ये ७३३२.९ अमेरिकी डॉलर इतका होता. तर बांगलादेशमध्ये हाच आकडा ५८११.६ अमेरिकी डॉलर इतका होता. यावरुन भारतच पुढे असल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती पंकज चौधरी यांनी संसदेत दिली. 

आयएमएफ काय सांगतं?आयएमएफच्या माहितीनुसार एप्रिल २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १२.५ टक्के इतक्या दरानं वाढली आहे. हा आजवरचा विक्रम आहे, असं पंकज चौधरी म्हणाले. भारताचं दरडोई उत्पन्न २०१६ साली बांगलादेशपेक्षा ४१ टक्क्यांनी अधिक होते. त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न ५८३९.९ अमेरिकी डॉलर, तर बांगलादेशचं ४११८.९ अमेरिकी डॉलर इतकं होतं. 

यंदाच्या वर्षात बांगलादेश सरकारकडून काही आकडे जारी करण्यात आले. त्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास बांगलादेश दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा पुढे निघून गेला आहे. बांगलादेश सरकारच्या दाव्यानुसार देशातील दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर पर्यंत पोहोचलं आहे. हाच आकडा २०१९-२० या वर्षात २०६४ डॉलर इतका होता. भारताशी तुलना केल्यास दरडोई उत्पन्नाचा भारताचा आकडा १९४७.४१ डॉलर इतका आहे.

विश्लेषकांनी बांगलादेशचे आकडे नाकारलेदरम्यान, भारतीय अर्थ विश्लेषकांनी बांगलादेश सरकारनं जारी केलेले आकडे नाकारले आहेत. एका परदेशी वित्तीय कंपनीत काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञाच्या माहितीनुसार बांगलादेश एक लेबर इंटेसिव्ह एक्सपोर्ट इकोनॉमीवर आधारलेला देश आहे. त्यामुळे तो भारताला मागे टाकू शकेल असा विचार करणं चुकीचं आहे. भारतात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित होत असताना बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या आकड्यांची तुलना केली जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी