शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:05 PM

नवीन दर उद्या, 15 मार्च सकाळी 6 वाजेपासून लागू होतील.

Petrol and Diesel Prices Reduced: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली असून, नवीन किमती 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2 रुपयांनी कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोट्यवधी कुटुंबाचे कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलचे दर 50 ते 72 टक्क्यांनी वाढले होते. आपल्या शेजारील अनेक देशांमध्ये तर पेट्रोल उपलब्ध नव्हते. 1973 नंतर पहिल्यांदाच इंधनाचे सर्वात मोठे संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशावर त्याचा परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले.'

39 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी पुरी यांनी पुढे लिहिले की, 'भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर राहिला, स्वस्त दरात राहिला आणि सरकारची पावलेही हरित ऊर्जेकडे जात राहिली. याचा अर्थ भारताने उर्जेची उपलब्धता, शाश्वतता राखली. भारत हा एकमेव देश होता, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. पीएम मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 27 देशांकडून कच्चे तेल खरेदी करायचो, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही 39 देशांकडून खरेदी करत आहोत.' 

भारतातील पेट्रोलचे दर अनेक देशांपेक्षा कमी हरदीप पुरी पुढे लिहितात, '14 मार्च 2024 रोजी भारतात(भारतीय रुपयांप्रमाणे) पेट्रोल सरासरी ₹ 94 प्रति लिटर आहे, परंतु इटलीमध्ये ते ₹ 168.01, म्हणजेच 79% जास्त; फ्रान्समध्ये ₹166.87, म्हणजेच 78% जास्त; जर्मनीमध्ये ₹ 159.57, म्हणजेच 70% जास्त आणि स्पेनमध्ये ₹ 145.13, म्हणजेच 54% जास्त दराने विकले जाते. डिझेलच्या किमतींची तुलना केली, तर भारतात सरासरी ₹ 87 प्रति लिटर आहे, तर इटलीमध्ये ₹ 163.21, म्हणजेच 88% जास्त, फ्रान्समध्ये ₹163.57 म्हणजेच 86% जास्त, जर्मनीमध्ये ₹ 155.68, म्हणजे 79% जास्त आणि स्पेनमध्ये ₹ 138.07 म्हणजे 59% जास्त आहे.

जगभरात काहीही घडत असले तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक नागरिकाचा इंधन पुरवठा अखंडीत राहावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. देशाच्या प्रगतीचा वेग कधीच थांबला नाही. आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दिलासा होताच पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करुन त्यांच्या कुटुंबाला आणखी एक भेट दिली. मोदींनी नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले, तर भाजप शासित राज्यांनी व्हॅट दर कमी केले. हेच कारण आहे की, आजही भाजपशासित राज्ये आणि इतर राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीत सुमारे ₹15 आणि डिझेलच्या दरात सुमारे ₹11 चा फरक आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदी